नगरपालिकेच्या कामासाठी आकडा टाकून वीजचोरी

प्रफुल्ल भंडारी
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

दौंड : दौंड नगरपालिकेच्या जलवाहिनीचे खोदकाम सुरू आहे. खोदकाम करणाऱ्या मशीनसाठी लागणारी विज चक्क आकडा टाकून घेतली जात आहे. या प्रकरणात वीज चोरल्याप्रकरणी एका खासगी पर्यवेक्षकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 360 युनिट वीज चोरल्याप्रकरणी 16 हजार 710 रूपये वसूल करण्यात आले आहे.

दौंड : दौंड नगरपालिकेच्या जलवाहिनीचे खोदकाम सुरू आहे. खोदकाम करणाऱ्या मशीनसाठी लागणारी विज चक्क आकडा टाकून घेतली जात आहे. या प्रकरणात वीज चोरल्याप्रकरणी एका खासगी पर्यवेक्षकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 360 युनिट वीज चोरल्याप्रकरणी 16 हजार 710 रूपये वसूल करण्यात आले आहे.

दौंड शहरात नेने चाळ येथे 21 ऑक्टोबर रोजी नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी पेव्हर ब्लॅाक असलेल्या रस्त्याचे खोदकाम कंत्राटदाराकडून ब्रेकर यंत्राच्या साह्याने सुरू केले होते. सदर ब्रेकरसाठी महावितरणच्या वीजवाहक तारांवर आकडा टाकून वीज चोरून रस्ता खोदला जात होता. सदर प्रकार महाराष्ट्र राज्य होलार समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष विनायक माने व लिंगाळी (ता. दौंड) चे माजी सरपंच नरेश डाळिंबे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी जाऊन काम थांबवून महावितरणला या चोरीसंबंधी माहिती दिली. महावितरणच्या कर्मचार्यांनी सदर ब्रेकर जप्त केला असून मेसर्स वाय. के. हिंगणे (बारामती) या कंत्राटी फर्मचा पर्यवेक्षक गणेश अचितराव गांगर्डे (मूळ रा. कर्जत, जि. नगर, सध्या रा. दौंड) याला 360 युनिट वीज चोरल्याप्रकरणी एकूण 16 हजार 700 रूपयांचा दंड ठोठावला. दरम्यान संबंधित वीजचोराने आज (ता. 23) दंडाची रक्कम भरल्याची माहिती महावितरणचे सहायक अभियंता संदीप रणदिवे यांनी दिली.

नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात यांना आज (ता. 23) या बाबत विचारले असता ते म्हणाले, एकूण 18 कोटी रूपये खर्चाच्या जलवाहिनी टाकण्याचे काम कंत्राट पध्दतीने दिले आहे. कंत्राटी काम असल्याने रविवारी देखील काम सुरू होते. कंत्राटदाराच्या पर्यवेक्षकाने वीज चोरल्याची माहिती मिळाली परंतु तपशील कळालेले नाही.

महावितरण व नगरपालिकेचे नियंत्रण नाही...

दौंड शहरात मुख्य व अंतर्गत रस्त्यांची आधीच दुरवस्था असताना अनेक ठिकाणी रस्त्यांचे ब्रेकरने खोदकाम सुरू आहे. शहरात राजरोसपणे आकडा टाकून वीजचोरी सुरू असून वीजचोरांवर महावितरणचे नियंत्रण नाही. त्याचप्रमाणे वीजचोरी करून सदर खोदकाम सुरू असताना नगरपालिकेचे कोणीही जबाबदार अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हते.

Web Title: Illegal electricity use for municipal work