क्राईम १७

क्राईम १७
Published on

दारू अड्ड्यावर
मालगावात छापा

सातारा : मालगाव (ता. सातारा) हद्दीत चालणाऱ्या बेकायदा दारू अड्ड्यावर छापा टाकून तालुका पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. समीर आयनाज पटेल (रा. मालगाव, ता. सातारा) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून ९२० रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
...........
वारीसाठी गेलेला
युवक बेपत्ता

सातारा : पायी दिंडी वारीसाठी गेलेला युवक बेपत्ता झाल्याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. गणेश हणमंत शिंदे (वय २५, रा. बसाप्पा पेठ) असे त्याचे नाव आहे. याबाबत नितीन शिवाजी करपे (रा. पिरवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. मामाचा मुलगा गणेश हा पायी दिंडी वारीसाठी लोणंद येथे जातो, असे सांगून १९ जुलैला घरातून गेला होता. तो अद्याप परत आला नसल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार मोहिते तपास करत आहेत.
................
बनावट दाखल्याप्रकरणी
वाढेतील एकावर गुन्हा

सातारा : वाढे (ता. सातारा) येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांनी हॉटेलसाठी दिलेल्या ना हरकत दाखल्यात खाडाखोड करून बनावट दाखला तयार केल्याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुप्रिया भगवान भोसले (रा. गोडोली) यांनी फिर्याद दिली आहे. वाढे येथील विशाल नलावडे यांनी या बनावट दाखल्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे व चुकीचा आढळल्यास गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार झालेल्या चौकशीत दाखला बनावट असल्याचे समोर आले. त्यानुसार सुप्रिया यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तींविरुद्ध तक्रार असल्याचे तसेच विशाल नलवडे यांनी सुरेश नलवडे, शंकर चव्हाण प्रभाकर नलवडे व विकास नलवडे यांच्यावर संशय असल्याचे म्हटले, त्यामुळे त्यांचीही चौकशी करण्यात यावी, असे सुप्रिया यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
...............

Marathi News Esakal
www.esakal.com