

शिरूर, ता. १९ : शिरूर शहर व परिसरात पोलिसांनी अवैध दारू धंद्यांविरोधात कडक मोहीम उघडली असून, गेल्या दोन दिवसांत पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत देशी-विदेशी दारूच्या बाटल्यांसह २७ हजार १६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या.
शहरासह कवठे येमाई, मलठण, टाकळी हाजी, आमदाबाद व डोंगरगण भागात ही कारवाई करण्यात आली. अविनाश प्रकाश उचाळे (वय ३२) व नितीन एकनाथ चोरे (वय ४३, दोघे रा. डोंगरगण, ता. शिरूर), लहू सखाराम वागदरे (कवठे येमाई, ता. शिरूर), अक्षय किसन साळवे (वय २६) व परशुराम वसंत पवार (वय ३५, दोघे रा. आमदाबाद, ता. शिरूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आमदाबाद येथील एका हॉटेलच्या आडोशाला सुरू असलेल्या विक्रीचाही पोलिसांनी पर्दाफाश केला.
अष्टविनायक महामार्गालगतच्या हॉटेल आणि ढाब्यांवर बेकायदा दारू विक्री सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार व गोविंद खटिंग यांच्यासह परशुराम सांगळे, नितीन सुद्रीक, बाळासाहेब भवर, सागर बोराडे, शंकर बल्लाळ, जी. एस. गोसावी, श्रीधर जायभाय, संदीप खेडकर या पथकाने ही कारवाई केली आहे.
अटक नाहीच, पोलिसांचा जरब संपला
चांडोह येथे देवीदास शिंदे याच्यावर सोमवारी (ता. १८) गुन्हा दाखल झाला. विशेष म्हणजे शुक्रवारी (ता. १५) कारवाई होऊन नोटीस बजावल्यानंतर अवघ्या साडेचार तासांत तो पुन्हा दारू विकताना आढळला. पोलिसांकडून गुन्हे दाखल होत असले तरी अटक होत नसल्याने गुन्हेगारांवर जरब राहिली नसल्याची चर्चा परिसरात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.