esakal | जमीनीची परस्पर मोजणी करून व्यावसायिकांच्या नावे करण्याचा घाट
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

जमीनीची परस्पर मोजणी करून व्यावसायिकांच्या नावे करण्याचा घाट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : धानोरी येथील जमीनीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही महापालिका व भुमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांनी जमीनीची मोजणी करून बनावट कागपत्रांद्वारे जमीन बांधकाम व्यावसायिकांच्या नावे केली. तेथे बांधकाम प्रकल्पाचा आराखडाही मंजुर करीत जमीन बळकावून फसवणूक केल्याप्रकरणी नामांकीत बांधकाम कंपनीच्या भागीदारांसह महापालिका व भुमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांविरुद्ध विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहीत घनश्‍याम गुप्ता (वय 60), मुकेश घनश्‍याम गुप्ता (वय 55), किशोर पोपटलाल गाडा (वय 45, रा. बंडगार्डन रस्ता) यांच्यासह पुणे महापालिका आणि हवेलीच्या भुमी अभिलेख अधिक्षक कार्यालयातील अधिकाऱ्यांविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विशाल सत्यवान खंडागळे (वय 35, रा. रामवाडी, नगर रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 28 ऑगस्ट 2009 ते 4 मे 2021 या कालावधीत घडला.

हेही वाचा: लक्ष्मीच्या पावलांनी गौराईचे आगमन; घरोघरी उत्साहात स्वागत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झालेल्या व्यक्ती या "मंत्रा 29 कोस्ट डेव्हलपर्स' या बांधकाम प्रकल्प कंपनीच्या भागीदार आहेत. फिर्यादी खंडागळे यांची धानोरी येथे जमीन आहे. त्यामध्ये सर्व्हे क्रमांक 29 मधील एकूण 15 हजार चौरस फुटांपैकी प्लॉट क्रमांक 16, 20 आणि 21 क्षेत्रातील नऊ गुंठे जागेबाबत सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल आहे. त्याबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे.

दरम्यान, संशयित आरोपींनी संबंधीत जमीनीची भुमी अभिलेख कार्यालयास खोटी माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे महापालिका व हवेलीच्या भुमी अभिलेख अधिक्षक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी संगनमत करून फिर्यादीच्या मालकीची सर्व्हे क्रमांक 29 मधील जागेची मोजणी करून हि जागा कंपनीची असल्याचे भासवून जमीन बळकाविण्याचा प्रयत्न केला. तसेच संबंधीत जागेवर "मंत्रा 29 गोल्ड कास्ट' या बांधकाम प्रकल्पासाठीचा आराखडाही मंजुर करुन घेतला. अशा प्रकारे फिर्यादीची जमीन बळकावून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image
go to top