esakal | बारामतीत अवैध सावकारी करणारे पोलिसांच्या रडारवर
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत अवैध सावकारी करणारे पोलिसांच्या रडारवर

बारामती शहरातील अवैध सावकारांविरुध्द आता पोलिस कडक कारवाईच्या पवित्र्यात आहेत. आज बारामतीच्या इतिहासात प्रथमच पोलिसांनी रिक्षाला स्पीकर लावून अवैध सावकारांविरुध्द निर्भय होत पोलिसात फिर्याद द्या, असे आवाहन केले. 

बारामतीत अवैध सावकारी करणारे पोलिसांच्या रडारवर

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती - शहरातील अवैध सावकारांविरुध्द आता पोलिस कडक कारवाईच्या पवित्र्यात आहेत. आज बारामतीच्या इतिहासात प्रथमच पोलिसांनी रिक्षाला स्पीकर लावून अवैध सावकारांविरुध्द निर्भय होत पोलिसात फिर्याद द्या, असे आवाहन केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नूतन पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर आता पहिल्यांदा अवैध सावकारांवर लक्ष केंद्रीत केले आहे. ज्यांच्याकडे सावकारी करण्याचा परवाना नाही, अशांनी अवैध रितीने पैसे दिले तर त्यांची वसूली होऊ शकणार नाही, असा थेट इशाराच नामदेव शिंदे यांनी दिला आहे.

बारामती पॅटर्न पोहचणार आता तेलंगणा राज्यातही, कारण... 

बारामतीतील एका प्रथितयश व्यापा-याने काही दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, नंतर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. हा प्रयत्न सावकारांच्या जाचाला कंटाळूनच झाला असल्याचा त्यांच्या कुटुंबियांचा संशय असून, या प्रकरणी बारामतीतील काही दिग्गजांकडे पोलिसांच्या तपासाची सुई फिरत आहे. पोलिसांनी कुटुंबियांशी चर्चा करुन या प्रकरणी वरिष्ठ स्तरावरुन चौकशीची सूत्रे फिरु लागली आहे. 

विद्यार्थी आणि पालकांनो, यंदा दिवाळीची सुट्टी फक्त पाचच दिवस!

नामदेव शिंदे यांनी आज शहरातील सर्व नागरिकांना जाहिर आवाहन करत अवैध सावकारांचा त्रास होत असेल तर थेट पोलिसांना माहिती द्यावी, मानसिक किंवा शारिरीक छळाच्या घटना घडल्यास सावकारांविरुध्द कडक कारवाईचा इशारा शिंदे यांनी दिला आहे. स्वताः पोलिस अधीक्षकांनीही याची नोंद घेतली असून या पुढील काळात अवैध सावकारांविरुध्दच्या मोहिमेला गती मिळणार आहे. 

कोरोना संपला, आता सकाळ अंक वितरण वाढवा : बचतगट महिलांची जोरदार मागणी

दोघांविरुध्द गुन्हा
दरम्यान काल रेखा अशोक राजेमहाडीक यांच्या फिर्यादीवरुन ममता प्रसन्न कोथमिरे (रा. आमराई, बारामती) व आकाश प्रकाश पलंगे (रा. भिगवण, ता. इंदापूर) यांच्याविरुध्द सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. रेखा यांचे पती अशोक महाडीक यांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून पोटरीवर ब्लेड मारुन घेत स्वताःला दुखापत करुन घेतली,  अशोक महाडीक दवाखान्यात उपचार घेत असतानाही या दोघांनी फोनवरुन मुलास पैशांची मागणी करुन दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. 

Edited By - Prashant Patil