अनधिकृत पार्किंगमुळे अपघातांचा धोका 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

फुरसुंगी : सासवड रस्त्यावर भेकराईनगर येथे मुख्य वाहतूक रस्त्याच्या कडेलाच अवजड वाहने अनधिकृतपणे थांबत असल्याने अपघात, वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. 

सोलापूर रस्त्याने हडपसर गाडीतळावर येऊन पुढे रामटेकडीमार्गे पुण्यात जाणारी जड वाहतूक गाडीतळाहून सासवड रस्त्याने कात्रजकडे वळवण्यात आली. तेव्हापासून सासवड रस्त्यावरील भेकराईनगर येथे सतत वाहतूक कोंडी, अपघात होतच आहेत.

काही दिवसांपूर्वी फुरसुंगी ग्रामपंचायत व हडपसर वाहतूक विभागाने सासवड रस्त्याच्या दोन्ही बाजूंची अतिक्रमणे काढली. सार्वजनिक बांधकाम विभागाने भेकराईनगर येथील रस्त्याच्या एका बाजूचे काही प्रमाणात रुंदीकरणही केले. यानंतर काही दिवस वाहतूक सुरळीतही झाली होती; मात्र डांबरीकरण केलेल्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूला नंतर ट्रक, टेंपो, खासगी वाहने, स्कूलबस, मालवाहू ट्रेलर, ट्रॅक्‍टर वाहतुकीला अडथळा करत रस्त्याकडेला व काहीवेळा तर थेट रस्त्यातच उभी केली जाऊ लागली. त्यामुळे पुन्हा वाहतुकीसाठी रस्ता अपुरा पडून वाहतूक कोंडीचा त्रास नागरिक, प्रवाशांना सहन करावा लागतो.

भेकराईनगर बस स्थानक, आयबीएम कंपनी, सत्यपुरम चौक, भेकराईनगर चौक, पॉवरहाउस व अन्य ठिकाणी बिनदिक्कतपणे ही मोठी वाहने वाहतुकीला अडथळा करत तासन्‌तास उभी केली जातत. वळणांच्या ठिकाणीही ही वाहने थांबवली जात असल्याने समोरून येणारे वाहन न दिसून अपघात होतात.

काही ठिकाणी अंधारातही थांबलेली वाहने न दिसून गंभीर अपघात होतात. रस्त्याच्या कडेला अशी वाहने थांबवून रात्रीच्या वेळी या वाहनांतच मद्यपानाच्या पार्ट्या रंगतात. रस्त्याने ये-जा करणाऱ्या महिला, मुली यांनाही यामुळे भीतीचा सामना करावा लागतो. वाहतूक पोलिस या बाबीकडे कधीच लक्ष देत नसल्याने व या वाहनांवर कारवाई होत नसल्याने वाहने थांबण्याचे प्रमाण व नागरिकांचा त्रासही वाढत चालला आहे.

Web Title: Illegal parking may result into accidents near phursungi