School Admission : अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नका; झेडपीचे पालकांना आवाहन

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने पुणे, पिंपरी चिंचवड व जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मिळून ४९ अनधिकृत शाळांची यादीच जाहीर केली आहे.
Pune ZP
pune zpsakal
Updated on

पुणे - आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी शहर व जिल्ह्यातील पालक धडपड करत असतात. यातून हे पालक अव्वाच्या सव्वा शुल्क भरून आपल्या पाल्यांचा प्रवेश अशा खासगी शाळांमध्ये करत असतात. मात्र अनेकदा या शाळाच अनधिकृत असण्याचा धोका असतो.

हे टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने पुणे, पिंपरी चिंचवड व जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मिळून ४९ अनधिकृत शाळांची यादीच बुधवारी (ता.१०) जाहीर केली आहे. या यादीच्या माध्यमातून शिक्षण विभागाने पालकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. अशा अनधिकृत शाळांमध्ये पाल्याचा प्रवेश न घेण्याचे आवाहनही केले आहे.

या अनधिकृत शाळांमध्ये पुणे शहरातील (पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांसह मिळून) १४, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २५ आणि पिंपरी चिंचवडमधील ११ शाळांचा समावेश असल्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे यांनी सांगितले.

शहर व जिल्ह्यातील अनधिकृत शाळांचा शोध घेण्यासाठी पुणे व पिंपरी - चिंचवड महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे मोहीम राबविली होती. या मोहिमेत अनधिकृत आढळून आलेल्या शाळांची यादी जाहीर करण्यात आल्याचे नाईकडे यांनी स्पष्ट केले.

पुण्यातील अनधिकृत शाळा

पुणे शहर (हवेली तालुक्यासह) : ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल, उंड्री, नारायणा इ टेक्नो स्कूल, वाघोली, दि गोल्डन इरा इंग्लिश मीडियम स्कूल, फ्लोरिंग फ्लोरा इंग्लिश मीडियम स्कूल, मांजरी बुद्रूक, इ. एम. एच. इंग्लिश मीडियम स्कूल, फुरसुंगी, सी. टी. ई. एल. इंग्लिश मीडियम स्कूल, भेकराईनगर, द टायगर इज इंटरनॅशनल स्कूल कदमवाकवस्ती, मेरीगोल्ड इंटरनॅशनल स्कूल, कदमवाकवस्ती, शिव समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल, जांभूळवाडी, दारूल मदिनाह स्कूल, पारघेनगर, कोंढवा खुर्द, टीम्स तकवा इस्लामिक स्कूल ॲँड मक्तब, कोंढवा खुर्द, लेगसी हायस्कूल, अश्रफनगर, कोंढवा बुद्रूक, इमॅन्युअल पब्लिक स्कूल, महंमदवाडी.

पिंपरी-चिंचवड

पीपल एज्युकेशन ट्रस्ट, गांधीनगर, पिंपळे निलख, चैतन्य इंग्लिश मीडियम स्कूल, विशालनगर, पिंपळे निलख, आयडियल इंग्लिश स्कूल, जवळकरनगर, पिंपळे गुरव, संपलिंग्स इंग्लिश मीडियम स्कूल, चिंचवडेनगर, मोशी, लिट्ल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल, चिंचवडेनगर, नवजीत विद्यालय लक्ष्मीनगर, वाल्हेकरवाडी, किड्‌सजी स्कूल, पिंपळे सौदागर, एम. एस. स्कूल फॉर किड्स, सांगवी, क्रिस्टल मॉडर्न स्कूल, वडमुखवाडी, चऱ्होली, माऊंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कूल, कासारवाडी, ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड.

‘आरटीई’ कायद्यातील तरतुदीनुसार कोणतीही शाळा ही स्थानिक प्राधिकरणाच्या मान्यतेशिवाय आणि ना हरकत प्रमाणपत्राशिवाय सुरू करता येत नाही. तरीही काही शाळा या कायद्याचे उल्लंघन करून, स्थानिक प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय चालविल्या जात आहेत, अशा शाळा या अनधिकृत आहेत.

- संजय नाईकडे, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक), पुणे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाच्या अनेक खासगी शाळा या अनधिकृत आहेत. तरीही या शाळा पालकांची आणि विद्यार्थ्यांची फसवणूक करून त्यांना प्रवेश देत आहेत. पालकांची फसवणूक टाळण्यासाठी अनधिकृत शाळा पूर्णपणे बंद करणे आवश्यक आहेत.

- संदीप कांचन, पालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.