पिस्तूल बाळगल्याप्रकरणी मुंढव्यात तरुणास अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

मुंढवा - बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी मुंढवा गुन्हे शाखेच्या पथकाने तरुणास अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र ढवळे यांनी दिली. अश्‍पाक ऊर्फ महाराज शफीक शेख (रा. गवळी गोठ्याजवळ, विकासनगर, घोरपडी) याला अटक केली.

दीपक सूर्यवंशी व अश्‍पाक शेख हे रेकॉर्डवरील गुन्हेगार पिस्तूल घेऊन विकासनगर नाल्याच्या कडेला संशयास्पदरीत्या थांबल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार मुंढवा गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून शेख यास पकडले.

Web Title: Illegaon keeping pistol; one arrested from Mundhwa