esakal | वेताळ टेकडीवरील खाणीत मूर्तीं विसर्जन झाल्यास अटक होणार
sakal

बोलून बातमी शोधा

वेताळ टेकडीवरील खाणीत मूर्तीं विसर्जन झाल्यास अटक होणार

वेताळ टेकडीवरील खाणीत मूर्तीं विसर्जन झाल्यास अटक होणार

sakal_logo
By
मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

पुणे : शहरातील नदी, नाले आणि खाणींमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यास महापालिकेने बंदी घातली तरी, त्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे पुणे शहरात दिसून येत आहे. पौड रस्त्यावरील वेताळ टेकडीवरील खाणीमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन होत असल्याची छायाचित्रे पर्यावरणप्रेमी नागरिकांनी टिपली आहेत. त्यांनी या बाबत वनखात्याला कळविले आहे. टेकडीवरील खाणीत मूर्तीविसर्जन करणाऱ्यांवर वन विभागाच्या नियमांनुसार कठोर कारवाई होईल, असे वन विभागाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: ओबीसी समाजाला द्यावे, त्यानंतरच निवडणुका घ्याव्यात- पाटील

केळेवाडी जवळील काही नागरिकांनी वेताळ टेकडीवर गणेश मूर्तींचे विसर्जन केले. या टेकडीवर फिरायवयास जाणाऱ्या नागरिकांनी त्याची छायाचित्रे काढली. वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांना ट्विटरवरून टॅगही केले. या ठिकाणी वन खात्याने सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी आणि गणेश मूर्तींचे तेथे विसर्जन करण्यास बंदी घालावी, अशी पर्यावरण प्रेमी नागरिकांची मागणी आहे.

या बाबत पर्यावरणप्रेमी सुषमा दात्ये म्हणाल्या, ‘‘जलस्त्रोत तर या पूर्वीच प्रदूषित होत आहेत. परंतु, त्यात गणेशमूर्तीचेही विसर्जन होऊ लागले आहे, ही चिंचेची बाब आहे. खाणीत मूर्ती विसर्जित झाल्यास तेथील जैवविविधता नष्ट होते. कारण गणेशमूर्ती ही प्लॅस्टर ऑफ पॅरिसची असते. तसेच स्थलांतरित पक्षी पाणथळ जागेजवळ येतात. परंतु, तेथील पाणवठे प्रदूषित झाल्यास त्यांनाही अपाय होऊ शकतो’’

पावसाळ्यानंतर पाऊस कमी झाल्यावर न विरघळलेल्या मूर्तींमुळे नागरिकांच्या भावनांना धक्का पोचू शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. सेव्ह पुणे हिल्सनेही या बाबत महापालिका, वनविभागाने तातडीने कार्यवाही करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आवाहन केले आहे. पुण्यातील अनेक पर्यावऱणप्रेमी नागरिकांनीही झालेल्या प्रकाराबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

या बाबत ‘सकाळ’ने पुणे विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘गणेश विसर्जन मिरणुकीच्या दिवशी वेताळ टेकडीवर बंदोबस्त ठेवण्यात येईल. तसेच मूर्ती विसर्जन करणाऱ्यांवर वन अधिनियम १९९२७ च्या अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल,’ असे स्पष्ट केले. या कारवाईतंर्गत गुन्हा दाखल होऊन संबंधित व्यक्तीला अटकही होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.

loading image
go to top