Ananat chaturdashi 2020 : गणरायाच्या विसर्जनासाठी बारामतीत नगरपालिकेकडून रथ

मिलिंद संगई
Tuesday, 1 September 2020

कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमिवर विसर्जनाची गैरसोय होऊ नये यासाठी बारामती नगरपालिकेने आज तब्बल 12 विसर्जन रथ तयार करुन घरोघरी जात मूर्ती संकलनाची संकल्पना राबवली. या शिवाय 30 ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड तयार केलेले असून त्यात लोकांनी मूर्ती विसर्जित करावी अशी अपेक्षा आहे.

बारामती (पुणे) : कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमिवर विसर्जनाची गैरसोय होऊ नये यासाठी बारामती नगरपालिकेने आज तब्बल 12 विसर्जन रथ तयार करुन घरोघरी जात मूर्ती संकलनाची संकल्पना राबवली. या शिवाय 30 ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड तयार केलेले असून त्यात लोकांनी मूर्ती विसर्जित करावी अशी अपेक्षा आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी या बाबत माहिती दिली. यंदा नीरा डावा कालव्याला पाणीच नसल्याने कालव्यात मूर्ती विसर्जन शक्य नसल्याने नगरपालिकेने कृत्रिम कुंड तयार केलेले आहेत, या शिवाय ज्यांची मूर्ती दान करण्याची इच्छा आहे त्यांच्याकडून स्वेच्छेने मूर्ती दिल्यास घरोघरी जाऊन नगरपालिकेच्या विसर्जन रथामध्ये मूर्ती संकलन केले जात आहे.

पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुक होणार ढोल-ताशाविना

बारामती नगरपालिकेने इंदापूर रस्ता व जळोची येथील दोन मोठ्या विहींरीमध्ये विधिवत मूर्तीचे विसर्जन करण्याची सोय केलेली आहे. आज सकाळपासूनच मूर्ती संकलन व कुंडात विसर्जन नागरिकांनी सुरु केले आहे. काही उत्साही नागरिकांनी क-हा नदीत विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Immersion ratha from Baramati Municipality