Bhor Crime : रानडुक्कराची शिकार करून मांसविक्री करणा-या परप्रांतीय तरुणास अटक

भोर तालुक्याच्या वीसगाव खो-यातील खानापूर गावात रानडुक्कराची शिकार करून त्याचे मांसविक्री करणा-या परप्रांतीय तरुणास वन विभागाच्या कर्मचा-यानी पकडले.
Crime
CrimeSakal

भोर - तालुक्याच्या वीसगाव खो-यातील खानापूर गावात रानडुक्कराची शिकार करून त्याचे मांसविक्री करणा-या परप्रांतीय तरुणास वन विभागाच्या कर्मचा-यानी पकडले. भोरच्या सहाय्यक वनरक्षक श्रीमती शितल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत यांनी सहका-यांसमवेत गुरुवारी (ता.२६) दुपारी दीड वाजता ही कारवाई केली. राजा हिंदूस्थानी किरडपारधी (जिल्हा कटणी, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

त्याने आणि त्याच्या साथीदाराने वीसगाव खो-यातील खानापूर-हातनोशीच्या ड़ोंगरात रानडुक्कराची शिकार केली होती. गुरुवारी सकाळी खानापूर गावात दोघेजण रानडुक्कराचे मांस विक्रीसाठी घेवून आल्याची माहिती वन विभागाला समजली. भोरचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजीराव राऊत यांनी वनपाल संदीप खट्टे, वनरक्षक पांडुरंग गुट्टे, शिवकुमार होनराव, कृष्णा देठे, विशाल आढागळे यांच्यासह खानापूर गावात सापळा रचला.

त्यामध्ये राजा हिंदुस्थानी किरडपारधी यास पकडले मात्र त्याचा साथीदार पळून गेला. आरोपीकडील मांस आणि विक्रीचे साहित्य जप्त करण्यात आले. वन विभागाने आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास एका दिवसाची वन कोढडी देण्यात आली. पारधी समाजाचे तीनचार कुटुंबे चार दिवसांपासून ही खानापूर व हातनोशीच्या डोंगराच्या बाजूला असलेल्या महावितरणच्या केंद्राच्या बाजूला पाल टाकून राहात आहेत.

सध्या त्या ठिकाणी एक वृध्द महिला, तीन महिला आणि लहान मुलेच आढळून आली आहेत. आरोपींनी रानडुक्कराची शिकार कोठे केली आणि आणखी कोणत्या वन्य प्राण्यांची शिकार केली आहे. याबाबत वन विभागाचे कर्मचारी चौकशी करीत आहेत. पुण्याचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते व भोरच्या सहाय्यक वनरक्षक श्रीमती शितल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत पुढील तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com