चित्रपटात तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढतेय - मंजुळे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

चित्रपट हा कलांचा एक गुच्छ आहे. यामध्ये कथेबरोबरच संगीतदेखील महत्त्वाचे आहे आणि  संगीत व बाकीचे बारकावे यांसाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता चित्रपटांत साउंड इफेक्‍ट, व्हीएफएक्‍स, ॲनिमेशन या गोष्टींचा वापर सध्या जगभरात वाढत आहे. यामुळे माध्यमाची ताकद वाढत आहे, असे मत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले.

पुणे - चित्रपट हा कलांचा एक गुच्छ आहे. यामध्ये कथेबरोबरच संगीतदेखील महत्त्वाचे आहे आणि  संगीत व बाकीचे बारकावे यांसाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता चित्रपटांत साउंड इफेक्‍ट, व्हीएफएक्‍स, ॲनिमेशन या गोष्टींचा वापर सध्या जगभरात वाढत आहे. यामुळे माध्यमाची ताकद वाढत आहे, असे मत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले. 

चित्रपट हा समाजमनाचा आरसा आहे, असे म्हटले जाते; पण माझ्या जीवनाचे प्रतिबिंब मला त्यात कधी दिसलेच नाही, म्हणून याच माध्यमातून मी माझी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत आहे, असे ते म्हणाले. सॉफ्टवेअर एक्‍सपोर्टर्स असोसिएशन ऑफ पुणे वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. त्या वेळी ते बोलत होते. रवी सुब्रह्मण्यम, अश्विन मेघा, समीर सोमण, आशुतोष पारसनीस, अभिजित अत्रे आदी उपस्थित होते. आपण शिव्या देतो, मद्य पितो. मात्र, या गोष्टी आपण चित्रपटात मांडू शकत नाही. आपल्याला सेन्सॉरची भीती असते. आता नेटफ्लिक्‍स, ॲमेझॉन प्राइम यांसारख्या माध्यमातून आपण आपल्याला जे सांगायचे ते सांगू शकत आहोत. यामुळे अधिक उन्नत सिनेमा तयार होईल, असे मंजुळे यांनी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The importance of technology is increasing in film Nagraj Manjule