जुलै महिन्यात पुण्यात लॉकडाउन असणार की नाही; वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला, तरी पुणे शहरातील व्यवहार आणि परिस्थितीमध्ये फारसा बदल होणार नाही, असा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे.

पुणे : राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला, तरी पुणे शहरातील व्यवहार आणि परिस्थितीमध्ये फारसा बदल होणार नाही, असा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे.

तसेच सध्या असलेल्या बाधित क्षेत्रामध्ये फेरबदल करून नवीन क्षेत्र जाहीर केली जाऊ शकतात, असेही महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. 

राज्यासह पुणे शहरात कोरोना बाधितांची संख्यांची वाढत आहे. या वाढती संख्या विचारात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे जाहीर केले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

त्यापार्श्‍वभूमीवर पुणे शहरात नव्याने लॉकडाऊन लागू होणार का, सध्याच्या परिस्थितीत काय बदल होणार का, हॉटेलसह अन्य व्यवसायांना परवानगी मिळणार का असे अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. 

याबाबत महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना विचारले असता, ते म्हणाले, "पुणे शहरात जे व्यवहार सुरू आहेत. ते सुरळीत राहतील. नव्याने काही व्यवसायांना परवानगी देण्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. केंद्र आणि राज्य सरकारकडून जे निर्णय येतील, त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल. परंतु स्थानिक पातळीवर त्या त्या भागातील रग्णसंख्या विचारात घेऊन निर्बंध लादण्यात येतील. तसेच सध्या असलेल्या बाधित क्षेत्रामध्ये आवश्‍यकता असेल, तसा फेरबदल करण्यात येईल.''

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important news about the lockdown in Pune