महत्वाची बातमी : विद्यार्थ्यांनो आता तुम्हाला करिअर निवडने झाले सोपे...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

-विद्यार्थ्यांच्या करिअरची माहिती 'महाकरिअर पोर्टल'व्यासपीठावर होणार उपलब्ध
-राज्यातील ९ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त

पुणे : विद्यार्थ्यांना आपले करिअर निवडताना त्यासंदर्भातील आधुनिक कोर्सेसची अत्यंत उपयुक्त माहिती आता 'महाराष्ट्र करियर गाईडन्स पोर्टल'व्दारे एकाच व्यासपीठावर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे करिअरची दिशा निश्चित करताना हे पोर्टल अधिक उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

शालेय शिक्षण विभाग, यूनिसेफ आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या ।संयुक्त विद्यमाने राज्यातील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या या 'पोर्टल'चे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते ऑनलाईनद्वारे करण्यात आले. या कार्यक्रमात राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, समुपदेशक, विद्यार्थी व शिक्षण विभागातील अधिकारी असे जवळपास दहा हजार व्यक्तींनी उपस्थित होते. 'हे पोर्टल विद्यार्थ्यांना करिअर ठरविताना फायदेशीर ठरेल,'असा विश्वास गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

"मुल-मुलींना आपले शिक्षण पूर्ण करतानाच कुटुंबाला हातभार लावावा लागतो. अशा विद्यार्थ्यांची गरज विचारात घेऊन त्यांना पोर्टलद्वारे संधी उपलब्ध करून देण्यात आली आल्याचे पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसंचालक विकास गरड यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी केले. 

हेही वाचा- कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलंय आनंदनगर

'www.mahacareerportal.com' हे महाराष्ट्र करियर गाईडन्स पोर्टल कार्यन्वित  

'महाराष्ट्र करियर गाईडन्स पोर्टल'ची वैशिष्ट्ये :
- राज्यातील ९ ते १२ वीच्या  जवळपास ६६ लाख विद्यार्थ्यांना होईल फायदा
- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या ५५६ कोर्सेसची माहिती
- २१ हजार व्यावसायिक संस्था आणि महाविद्यालयाची माहिती संकलित
-  संबंधित कोर्सेसचा कालावधी, शुल्क, प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, उपलब्ध नोकरी इत्यादी माहिती असेल
- विद्यार्थ्यांसाठी २७ मे २०२० पासून पोर्टल होईल खुले

-सरल प्रणालीतील आयडी,पासवर्डद्वारे विद्यार्थ्यांना पोर्टलचा वापर करता येईल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important news about students' careers