इंदापूरच्या पश्‍चिम भागातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी

राजकुमार थाेरात
Thursday, 10 September 2020

इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील १८ गावामध्ये आजपासुन दीड दिवसासाठी व्यवहार सुरु करण्याची परवानगी वालचंदनगर पोलिसांनी दिली आहे.

वालचंदनगर : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील १८ गावामध्ये आजपासुन दीड दिवसासाठी व्यवहार सुरु करण्याची परवानगी वालचंदनगर पोलिसांनी दिली असून १५ दिवसानंतर बंद असलेले व्यवहार सुरु झाले असून नागरिकांनी खरेदीसाठी 
गर्दी न करण्याचे आवाहन वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी केले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये काेरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.  वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील गावामध्ये १९३ कोरोना रुग्ण आहेत. पश्‍चिम भागातील १८ गावामध्ये कन्टेमेंट झोनअसून गेल्या १५ दिवसापासुन अत्याआवश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.

आज गुरुवार (ता. १०) रोजी इंदापूरमध्ये  झालेल्या बैठकीमध्ये शनिवार (ता. १२) पासुन संपूर्ण तालुक्यामध्ये जनता कर्फ्यू  जाहिर होण्याची शक्यता असल्याने वालचंदनगर पोलिसांनी तातडीने पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावातील दुकाने आजपासुन दुपारी ४ वाजल्यानंतर दीड दिवसासाठी सुरु करण्याची परवानगी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने प्रशासनाने २७ ऑगस्टपासुन लॉकडाऊन जाहीर केला होता. ऐन गणेशउत्सावाच्या काळामध्ये  लॉकडाऊन जाहिर केल्यामुळे व्यापाऱ्यांचे  व शेतकऱ्यांचे अताेतान नुकसान झाले आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय झाली हाेती. पश्‍चिम भागातील रणगाव, भवानीनगर , सणसर , अंथुर्णे , हिंगणेवाडी, उद्घट, वालचंदनगर , कळंब , न्हावी , निरवांगी , शेळगाव, बोरी ,कुरवली ,जाचकवस्ती, बेलवाडी, जंक्शन, लासुर्णे, निमसाखर या गावातील दुकाने बंद होती.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रशासनाला सहकार्य करा : दिलीप पवार
प्रशासनाचा निर्णय झाल्यानंतर शनिवारपासुन संपूर्ण तालुक्यामध्ये आठ दिवसासाठी जनता कर्फ्यू लागू होण्याची शक्यता आहे. पश्‍चिम भागातील नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून किराणा माल,भाजीपाला व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी आजपासुन परवानगी दिली आहे. तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असून नागरिकांनी दुकानामध्ये व रस्त्यावर गर्दी करु नये,मास्क शिवाय घराच्या बाहेर पडू नका,घरातील एकाच व्यक्तीने खरेदीसाठी बाहेर पडावे.शनिवार नंतर आठ दिवसामध्ये प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी केले आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important news for the citizens of the western part of Indapur