पुण्याच्या लॉकडाऊनसंदर्भात महत्वाची बातमी; पुढे काय होणार?

Important news regarding Pune lockdown What happens next
Important news regarding Pune lockdown What happens next

पुणे : पुण्यातल्या 'लॉकडाउन'चा मुक्काम वाढतोय; तो काही येत्या ३१ मेपर्यंत पुणेकरांची पाठ सोडण्याची चिन्हे नाहीत. पण आपला मुक्काम वाढविताना तो पुण्यातल्या बाधित क्षेत्रातल्या (कटेन्मेट झोन) रहिवाशांना मात्र; काही केल्या घराबाहेर पडू देणार नाही, हे जवळपास निश्चित झालयं...परिणामी, नव्या लॉकडाउनमध्ये शहरातल्या ६९ बाधित क्षेत्रातले नागरिक कुठच्याही कारणांकरिता रस्त्यांवर उतरणार नाही, याची दक्षता महापालिका आणि पोलिस खाते घेत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्याचाच भाग म्हणून शिवाजी रस्त्यापलीकडच्या सर्व पेठांभोवती पत्रे आणि बॅरिकेडचे जाळे विणलं गेलयं. म्हणजे, या भागातल्यांना आता पुढच्या काही दिवसांचे जीवनावश्यक वस्तुंसह गरजेचे साहित्य घरात गोळा करून ठेवावे लागेल. कोरोनाच्या थैमानाच्या पार्श्वभूमीवर येत्या १७ मेपर्यंतचे लॉकडाउन वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत आहे. तेव्हा चौथ्या टप्प्यातील म्हणजे, पुढच्य पंधरा दिवसांसाठीचे लॉकडाउन जाहीर होण्याची शक्यता आहे. तेव्हा, बाधित क्षेत्रात अधिक कठोर उपाय आखून कोरोनाला लागाम घालता जाणार असल्याचे दिसत आहे.

म्हणून बिल गेट्स यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

शहरातील बाधित क्षेत्रातील कोरोनाला रोखण्यासाठी प्रचंड प्रयत्न करूनही 'इलाज' होत नसल्याने या भागांत खबरदारीचे उपाय आखले आहेत. त्यातूनच जीवनाश्यक वस्तुंची दुकाने पूर्णपणे बंद ठेवताना बाधित क्षेत्रांचे एन्ट्री आणि आऊट पॉइंट रोखण्यात आले आहेत. तो केवळ बॅरिकेडसच नव्हे, रस्ते, चौक आणि अगदी गल्लीबोळांच्या तोंडांशी पोलिसांची ताफा तैनात राहणार आहे. वाहने ये-जा करणार नाहीत, या उद्देशाने रस्त्यांवर मजबूत बॅरिकेडस केले असून, पायी ये-जा करायला जागा ठेवली जाणार नाही. त्यापलीकडे जाऊन बाधित क्षेत्रात क्षेत्रात किरणा दुकानदार, भाजीवाले आणि अन्य वस्तुंच विक्रेतही येणार नाहीत, याचा बंदोबस्त करण्यात आला नाही. त्यामुळे बाधित क्षेत्रातील रहिवासी घरातून बाहेर येणार नाहीत आणि कोरोनाच्या संसर्गाची साखळी तुटली जाण्याच आशा संबंधित यंत्रणांना आहे.

पुण्यातील खव्वयांसाठी महत्वाची बातमी; आधी वाचा मग ऑर्डर करा

पुणे शहरातील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राची नावे :
मंगळवार पेठ, जूना बाजार, पर्वती दर्शन परिसर १, २, पर्वती चाळ क्र. ५२ झोपडपट्टी, पर्वती दांडेकर पूल झोपडपट्टी, पर्वती दत्तवाडी, पर्वती इंदिरानगर झोपडपट्टी नीलामय टॉकीज १, २, शहर मध्यवर्ती भाग कसबा, नाना भवानी पेठ, कोंढवा बुद्रुक, काकडे वस्ती, कोंढवा बुद्रुक, नॉटिंग हिल सोसायटी, उंड्री, होलेवस्ती, कात्रज, सुखसागरनगर, अंबामाता मंदिर परिसर, कोथरूड, शिवतारा इमारत बधाई स्वीटजवळ, कोथरूड चंद्रगुप्त सोसायटी, महाराज कॉम्प्लेक्स मार्ग, पुणे स्टेशन, ताडीवाला रस्ता, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन दक्षिणेकडील वसाहत, घोरपडी, बालाजीनगर, विकासनगर, पर्वती, तळजाई वस्ती १, २, धनकवडी, बालाजीनगर, पर्वती शिवदर्शन १, २, धनकवडी, गुलाबनगर चैतन्यनगर, आंबेगाव खुर्द जांभूळवाडी,  साईसमृध्दी परिसर, वडगावशेरी, गणेशनगर, रामनगर, टेम्पो चौक, लोहगाव, कालवडवस्ती, बिबवेवाडी, आंबेडकरनगर, मार्केट यार्ड, गुलटेकडी, डायसप्लॉट, मीनाताई ठाकरेनगर, बिबवेवाडी, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी स. नं. ६५०, गुलटेकडी, सेव्हन डे अ‍ॅडव्हेंटीज मिशन, बिबवेवाडी, ढोलेमळा झोपडपट्टी, प्रेमनगर झोपडपट्टी, येरवडा गांधीनगर, गांधीनगर २, ताडीगुत्ता, नागपूर चाळ, आदर्श इंदिरानगर, आळंदी रस्ता, फुलेनगर, आळंदी रोड, कळस, जाधववस्ती, येरवडा प्रभाग क्र. ६, हडपसर रामनगर, रामटेकडी, गोसावीवस्ती, वैदूवाडी, हडपसर सय्यदनगर १, २, ३, गुलामअलीनगर, कोंढवा खुर्द शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, तांबोळी बाजार, कोंढवा खुर्द मिठानगर, वानवडी एसआरपीएफ, शिवाजीनगर कामगार पुतळा, महात्मा गांधी झोपडपट्टी, पाटील इस्टेट, शिवाजीनगर रेल्वे लाइन उत्तरेकडील बाजू, शिवाजीनगर न. ता. वाडी, कामगार आयुक्त कार्यालयालगतची झोपडपट्टी, कॉँग्रेसभवन पाठीमागील बाजू, हडपसर चिंतामणीनगर, रेल्वे गेटजवळ, हडपसर आदर्श कॉलनी, वेताळनगर, सातववाडी, हडपसर माळवाडी, हांडेवाडी रस्ता, इंदिरानगर.

सोशल डिस्टंसिंगचं उल्लंघन केल्यावर साफ करावं लागणा टॉयलेट

पिंपरी चिंचवड शहरातील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राची नावे
खराळवाडी परिसर, पिंपरी, पीएमटी चौक परिसर, भोसरी, गुरूदत्त कॉलनी परिसर, भोसरी, रामराज्य प्लॅनेट परिसर, कासारवाडी, गणेश नगर परिसर, दापोडी, शास्त्री चौक परिसर, तनिष्का आर्किड परिसर, चºहोली, कृष्णराज कॉलनी परिसर, पिंपळे गुरव, नेहरूनगर बस डेपो परिसर, नेहरूनगर, कावेरीनगर पोलीस लाइन परिसर, वाकड, रूपीनगर परिसर तळवडे, गंधर्वनगरी परिसर मोशी, विजयनगर परिसर दिघी, तनिष्का आयकॉन परिसर दिघी, मधुबन सोसायटी परिसर, जुनी सांगवी, तपोवन रोड परिसर, पिंपरी वाघेरे, १६ नंबर बसस्टॉप परिसर, थेरगाव, शिवाजी चौक परिसर, पिंपळे निलख, इंदिरानगर परिसर चिंचवड, शुभश्री रो होऊस सोसायटी परिसर, पिंपळे सौदागर, साठ फुटी रोड परिसर, पिंपळे गुरव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com