टोमॅटो उत्पादकांसाठी महत्त्वाचे, नारायणगावचा बाजार...

रवींद्र पाटे
गुरुवार, 28 मे 2020

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील टोमॅटो उपबजार आजपासून सुरळीतपणे सुरू झाल्याने टोमॅटो बाजार भावात वाढ झाली आहे.

नारायणगाव (पुणे) : जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील टोमॅटो उपबजार आजपासून सुरळीतपणे सुरू झाल्याने टोमॅटो बाजार भावात वाढ झाली आहे. आज उपबजारात वीस हजार टोमॅटो क्रेटची आवक झाली. प्रतवारीनुसार टोमॅटो क्रेटला (वीस किलो) १३० रुपये ते २०० रुपयांदरम्यान भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी दिली.

बाजार समिती संचालक मंडळाच्या काल झालेल्या बैठकीनुसार आजपासून जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नारायणगाव, जुन्नर, ओतूर, आळेफाटा, बेल्हे उपबजार सुरू करण्याचा निर्णय घेतला. सोशल डिस्टिंगची काळजी घेऊन उपबजार सुरू करण्यात आले आहेत. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लॉककडाउनमुळे परप्रांतीय सुमारे दिडशे व्यापारी टोमॅटो खरेदीसाठी न आल्याने व सुमारे तीन हजार परप्रांतीय कामगार गावी निघून गेल्याने या वर्षीचा टोमॅटो हंगाम अडचणीत सापडला होता. व्यापारी नसल्याने मागील दोन महिने टोमॅटो खरेदी व विक्री व्यवहारावर परिणाम झाला होता. टोमॅटो क्रेटला तीस ते पन्नास रुपये भाव मिळत होता. या बाजारभावात टोमॅटो तोडणी व वाहतूक खर्च वसुल होत नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटोची तोडणी बंद केली होती. या मुळे शेतातच टोमॅटो खराब झाली. जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील बहुतेक शेतकऱ्यांनी मागील महिनाभरात तोडणी सुरू असलेल्या बाग काढून टाकल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उन्हाळी हंगाम वाया गेला असून, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

- शाळा सुरु झाल्यावर मुलांचे कसे होणार? पालकांनो, चिंता करु नका कारण...

लॉककडाउनमुळे कांदा, बटाटा, टोमॅटो व्यापारी खरेदीसाठी या वर्षी व्यापारी आले नाहीत. वाहतूक बंद असल्याने शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार मागील दोन महिने ठप्प झाले होते. शेतकऱ्यांची अडचण विचारात घेऊन बाजार समितीने आजपासून सर्व उपबजार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

- हिंजवडी पोलिसांच्या 'त्या' मेसेजमुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये परसली घबराट 

नारायणगाव टोमॅटो उपबजारात पंचवीस व्यापारी दाखल झाले आहेत. येथील उपबजारातून रोज सुमारे ८० वाहनातून मुंबई, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश या ठिकाणी टोमॅटो पाठवण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे टोमॅटोच्या बाजारभावात वाढ झाली आहे. इतर राज्यातील व्यापाऱ्यांशी संपर्क सुरू असून, देशातील सर्व राज्यात टोमॅटो विक्रीसाठी रवाना झाल्यास पुढील काही दिवसात टोमॅटोच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता आहे, असे काळे यांनी सांगितले.

बाजारात येताना काळजी घ्या 
जुन्नर तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. उपबजारात रेड झोनमधून येणाऱ्या चालक व वाहनांचा वावर असणार आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शेतमालाची खरेदी विक्री करताना व्यापारी, शेतकरी, चालक, बाजार समितीचे कर्मचारी यांनी नियमांचे पालन करावे. मास्क वापरावा, असे अवाहन काळे यांनी केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important for tomato growers, Narayangaon market