पुणे-नगर रस्त्याबाबत महत्वाची अपडेट; वाचा सविस्तर

पुणे-नगर रस्त्याबाबत महत्वाची अपडेट; वाचा सविस्तर

तळेगाव ढमढेरे : विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर काल (गुरुवार)  सायंकाळपासून आज शुक्रवारी दिवसभर पुणे- अहमदनगर हा रहदारीचा रस्ता वाहनांसाठी बंद करण्यात आल्याने रस्त्यावर अक्षरशः शुकशुकाट दिसत होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस यंत्रणेने रस्त्यावर ठिकठिकाणी बॅरिकेड उभे करून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्ण बंद केली आहे. नगरहून पुण्याकडे येणारी वाहतूक बंद असल्याने आज दिवसभर रस्त्याने मोकळा श्वास घेतला.

रस्त्यावर ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संचारबंदीमुळे रांजणगाव एमआयडीसीत जाणारी वाहने, कामगार आपल्या घरीच होते. विविध गावातील नागरिकांनी गावातच थांबण्यास प्राधान्य दिले. 

तसेच तळेगाव ढमढेरे परिसरातही विविध ठिकाणी  खबरदारी म्हणून पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेड लावली आहेत. शिक्रापूर, कोंढापुरी, कासारी, तळेगाव ढमढेरे व पुणे-नगर रस्त्यावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. 

नागरिकांनी कायदा व सुव्यव्यवस्थेचे पालन केल्याने परिसरात शांतता होती. संचारबंदीमुळे विविध गावातील आर्थिक व्यवहार थंडावले. खबरदारीचा उपाय म्हणून आज मोबाइलची इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. संचारबंदीमुळे नवीन वर्षाचा हौशी नागरिकांना आनंद लुटता आला नाही.

(संपादन : सागर डी. शेलार) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com