Welcome 2021: दरवर्षी गर्दीने गजबजून जाणारे पुण्यातील रस्ते पडले ओस!

New_Year_Eve
New_Year_Eve

पुणे : सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वागताच्या सेलिब्रेशनवरही यंदा कोरोनाचे सावट पाहायला मिळाले. मित्र-मैत्रिणींच्या पार्ट्या आणि कौटुंबिक स्नेहमिलनाचे प्रसंग यंदा कमीच पाहायला मिळाले. तसेच ज्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तेथील गर्दी रात्री 11 वाजण्याच्या आत घराकडे परतली होती.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून शहरात रात्री 11 ते सकाळी सहापर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील रात्री उशिरा बाहेर पडणे टाळले. त्यामुळे रस्त्यांवर अत्यल्प गर्दी होती. दरवर्षी थर्टी फस्टसाठी गजबजणारे फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, लष्कर आदी शहरातील मुख्य भागांमध्ये यंदा तुलनेने कमी गर्दी पाहायला मिळाली. तर घराघरांमध्ये गोडधोड आणि चविष्ट पदार्थ तयार करून नागरिकांनी नव्या वर्षाचे स्वागत केले. तसेच काहींनी जमावबंदी असल्यामुळे सहकुटुंब घराजवळील हॉटेल्समध्ये जाऊन सेलिब्रेशन केले.

नववर्षाच्या स्वागतासाठी शहरातील काही इमारती, चर्च सार्वजनिक ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी तरुणाई बऱ्याचदा घराबाहेरच असते. मात्र यंदा ते घरातच असल्याने पालकांना त्यांच्या बरोबर नवीन वर्षाचे स्वागत करता आले. अनेकांनी तर हॉटेलात न जाताच घरीच चमचमीत पदार्थ बनवून सेलिब्रेशन करण्याचा बेत आखला होता.

रात्री अकराच्या आताच हॉटेल बंद :
नागरिकांचा अल्प प्रतिसाद आणि पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईची भीती यामुळे शहरातील बहुतांश हॉटेल रात्री अकरापर्यंत बंद झाले होते. त्यामुळे हॉटेलमध्ये त्या परिसरात असलेली गर्दी पाहायला मिळाली नाही. संचारबंदीच्या वेळेमुळे यंदा न्यू इयरच्या सेलिब्रेशननिमित्त होणारा व्यवसाय कमी झाल्याची नाराजी हॉटेल चालकांनी व्यक्त केली. तर हॉटेलात बसून सेलिब्रेशन करता न आलेले तरुण देखील नाराज होते. मात्र, या निमित्ताने घरच्यांना वेळ देता आल्याची भावनाही अनेकांनी व्यक्त केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com