Baramati News: बारामतीतील काऱ्हाटीमध्ये सुनेत्रा पवारांच्या बॅनरवर शाईफेकीचा प्रकार; पोलिसांकडून तपास सुरू

Baramati News: तालुक्यातील काऱ्हाटीमध्ये लावलेल्या सुनेत्रा पवार यांच्या बॅनरवर अज्ञातांनी शाईफेक केल्याची घटना आज समोर आली.
Baramati News
Baramati NewsEsakal

बारामती- तालुक्यातील काऱ्हाटीमध्ये लावलेल्या सुनेत्रा पवार यांच्या बॅनरवर अज्ञातांनी शाईफेक केल्याची घटना आज समोर आली. काल रात्री अज्ञातांनी ही शाईफेक केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली. (Latest Marathi News)

भावी खासदार अशा आशयाचा एक बॅनर का-हाटी या गावात लावण्यात आला होता. या बॅनरवर अज्ञात व्यक्तीने शाई टाकली. ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांना या बाबत माहिती दिली. त्या नंतर ग्रामस्थांच्याच मदतीने पोलिसांनी हा बॅनर खाली उतरविल्याचे संजय जाधव यांनी नमूद केले.

Baramati News
Sakalchya Batmya Podcast : अनिल देशमुखांना जामीन पण सुटका नाही? आता CBI कडूनही गुन्हा दाखल

दरम्यान हा नेमका प्रकार कशातून घडला असावा, याचा पोलिस शोधन घेत आहेत. आगामी लोकसभा निवडणूकीत सुनेत्रा पवार या राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवार असू शकतात. त्या मुळे कोणी राजकीय आकसापोटी हे कृत्य केले असावे या बाबत पोलिसांनी माहिती घेण्यास प्रारंभ केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Marathi Tajya Batmya)

Baramati News
सोलापूरमध्ये पोलिस बंदोबस्तात 'निर्भय बनो'! कार्यक्रमाला येणाऱ्यांची पोलिसांकडून झडती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com