जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी सातत्याने नाविण्याचा ध्यास हवा; प्रतापराव पवार

सकाळचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांचा सल्ला ; सेवानिवृत्तांचा, विजेत्यांचा गौरव
prataprao pawar
prataprao pawarsakal

पुणे : जगात सध्या सर्वच क्षेत्रात मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी आपण सर्वांनी सातत्याने नावीन्याचा ध्यास घेतला पाहिजे. कोण, कधी, कोणते नवीन तंत्रज्ञान शोधेल, हे सांगता येत नाही. नवीन शोधले नाही तर, स्पर्धेत टिकता येत नाही. यासाठी बदलल्या काळाबरोबर आपल्यापुढची नेमकी आव्हाने काय आहेत, याचा आपण सर्वांनी सातत्याने विचार केला पाहिजे. शिवाय त्यादृष्टीने काम केले पाहिजे, असा सल्ला सकाळ माध्यम समूहाचे(sakal media group) अध्यक्ष प्रतापराव पवार(prataprao pawar) यांनी शनिवारी (ता. १) सकाळच्या कर्मचाऱ्यांना दिला.(In order to survive in the world competition, one has to constantly strive for innovation says Prataprao Pawar sakal media group)

सकाळच्या ९० व्या वर्धापनदिनी श्री. पवार यांच्या हस्ते गेल्या वर्षभरात सकाळमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा आणि वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेत विजेच्या ठरलेल्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी आजी-माजी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी सकाळचे संपादक-संचालक श्रीराम पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ, सकाळचे संपादक सम्राट फडणीस, मुख्य व्यवस्थापक वासुदेव मेदनकर आदी उपस्थित होते. सकाळ'समवेत प्रदीर्घ काळ सेवा केलेल्या आणि २०२१ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या राजेंद्र गिरमे, मनोहर पालांडे यांचा सत्कार करण्यात आला. या वर्षभरात सकाळमधील प्रदीर्घ सेवेनंतर चार कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. यामध्ये सहयोगी संपादक अनिल पवार आणि भालचंद्र प्रभू या अन्य दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

prataprao pawar
दत्तात्रय तुपे हे शेती, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात निष्ठेने काम करणारे व्यक्तीमत्व : शरद पवार

सध्या ॲमॅझॉन या कंपनीचा बारकाईने अभ्यास केल्यास, बदलत्या काळानुसार होणारा तंत्रज्ञान बदल, संस्था, माणसे कशी असतात आणि त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत, याचा उत्तम संगम या संस्थेत असल्याचे दिसून येते. बदलत्या काळाचा प्रामाणिक परामर्श घेणे आणि त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी टीमवर्क (सांघिक काम) करावे लागते. वेगळे काम करा, स्पर्धेत मात करा डिजिटलायझेनच्या माध्यमातून पैसे आणि अधिकाधिक नफा कसा कमावता येतो, हेच या संस्थेच्या अभ्यासातून शिकायला मिळते, असे पवार यांनी यावेळी सांगितले.ते म्हणाले, ‘‘कोणत्याही मशिनमधला प्रत्येक भाग ती मशिन चालू होण्यासाठी उपयुक्त ठरत असतो. त्यामुळे मशिनमधला प्रत्येक पार्ट महत्त्वाचा असतो.यानुसार सकाळ संस्थेच्या वाढीसाठी सकाळमधील वॉचमनपासून चेअरमनपर्यंत प्रत्येकाचा रोल महत्त्वाचा आहे. या सर्वांनी सांघिक भूमिकेतून प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. त्यामुळे सातत्याने नवनवीन शिक्षण, प्रशिक्षणाच्या माध्यमातून एकत्रितपणे काम केले पाहिजे. विशिष्ट दृष्टिकोन समोर ठेऊन काम केल्यास, सकाळ आंतरराष्ट्रीय दर्जाची आव्हाने पेलू शकेल.’’

prataprao pawar
घोरावडेश्वर सप्ताह समिती अध्यक्षपदी नितीन मुऱ्हे

वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धांत यश मिळविलेल्या चारू देशपांडे, राम शेळके, भूषण चौधरी, योगेश निगडे, हेमंत कोंडे, दीपक कांबळे, नीलेश देशमुख, विनायक बावडेकर, हरी गायकवाड, मिलिंद भुजबळ आणि सुनील जगताप यांना बक्षीसे देण्यात आली. क्रिकेट स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या मार्केटिंग विभागातील विनायक बावडेकर यांच्या नेतृत्वाखालील पन्हाळागड आणि उपविजेत्या ठरलेला उरुळी येथील मशिन विभागातील बाबूराव गोळे यांच्या नेतृत्वाखालील टीमचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन मंदार कुलकर्णी यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com