esakal | पुण्यात कलाकार मंडळींनी केला पोलिसांच्या कामाला मुजरा

बोलून बातमी शोधा

corona
पुण्यात कलाकार मंडळींनी केला पोलिसांच्या कामाला मुजरा
sakal_logo
By
- जागृती कुलकर्णी

सिंहगड रस्ता : ''पोलिसांच्या कार्याला मानाचा मुजरा देण्यासाठी आणि आम्ही या कार्यात तुमच्या सोबत आहोत'' असे सांगण्यासाठी कलाकार मंडळी सिंहगड रस्ता येथील वडगाव पुलाजवळ आली होती. निमित्त होतं ते पोलिसांनी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे आणि रसिक पुणेकरांना नियम पाळण्याचे आवाहन करण्याचे.

कोरोना काळात तसेच संचारबंदीच्या काळात पोलिस अहोरात्र काम करत आहेत. कोरोना योद्धा म्हणून उपस्थित राहून आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या या कार्याला मानाचा मुजरा करण्यासाठी अभिनेते राहुल सोलापूरकर, माधव अभ्यंकर, अमेय वाघ, सौरभ राव, आनंद इंगळे तसेच अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे, अक्षया देवधर, आणि संस्कृती बालगुडे उपस्थित होते. यावेळी पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश उमरे, प्रशांत कणसे शंकर सलगर यांच्यासह सिंहगड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच वाहतूक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा: नांदेड : गोरक्षणातील गायींची चाऱ्यापासून उपासमार; चारा दान करण्याचे आवाहन

वडगाव पुलाजवळ नाकाबंदी असलेल्या ठिकाणी या कलाकारांनी नागरिकांनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले, तसेच नियम पाळून पोलिसांना सहकार्य करावे, असेही यावेळी सांगितले. कलाकारांच्यावतीने पोलिसांना खाद्यपदार्थ देण्यात आले. तसेच चौकात नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केले अनावश्यक घराबाहेर पडू नका असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: विवाहबाह्य प्रेमप्रकरणातून केला बायको-मुलाचा खून; पतीची कबूली