Swapnil Lande
esakal
पुण्यात एका स्वयंघोषित भोंदू बाबाने दहावीत शिकणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वप्नील लांडे असं भोंदू बाबाचं नाव आहे. या प्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेतला जात आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात असा प्रकार घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.