बिबट्यांचा सुळसुळाट; तरुणांनी घेतला आक्रमक पवित्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

leopord attack

बिबट्यांचा सुळसुळाट; तरुणांनी घेतला आक्रमक पवित्रा

पारगाव,धामणी ता. आंबेगाव ; परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून तीन आठवड्यात चार ठिकाणी पाळीव जनावरांवर हल्ला करून एकूण दहा शेळ्या , एक गोऱ्हा, एक कुत्रा ठार केल्याने या परिसरात घबराट पसरली आहे वनखात्याला पिंजरा लावण्याची मागणी करून देखील वनखाते दुर्लक्ष करत असल्याने काल बुधवारी रात्री सरपंच सागर जाधव यांच्या नेतृत्वाखाली काही तरुणांनी बिबट्याचा वावर असणार्या ठिकाणी रात्रभर उघड्यावर झोपण्याचा निर्णय घेतला या अनोख्या आंदोलनामुळे वनविभाग खडबडून जागे झाले वनरक्षक एस.एन. अनासुने यांनी रात्री साडेदहा वाजता उघड्यावर झोपलेल्या तरुणांची भेट घेऊन उद्या लगेच पिंजरा लावण्याचे आश्वासन दिल्याने तरूण आपापल्या घरी निघून गेले.

आंबेगाव तालुक्यात घोडनदी , मीनानदी परिसर व डिंभे उजवा कालवा परिसरात मोठ्या प्रमाणावर बागायती क्षेत्र असल्याने या परिसरात बिबट्याने अनेक वर्षापासून आपले वास्तव्य केले आहे आता बिबट्याने जिरायती भागात देखील पशुधनावर मोठ्या प्रमाणावर हल्ले सुरु केले आहेत मागील महिनाभरापासून धामणी, पहाडदरा, धनगरदरा परिसरात बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे ,

हेही वाचा: दोन दिवसात शाळा उघडण्याबाबत निर्णय घेणार - वर्षा गायकवाड

त्याचबरोबर नागरिकांना बिबट्याचे वारंवार दर्शन होऊ लागल्याने धामणीचे सरपंच सागर जाधव यांनी वनखात्याला वारंवार विनवणी करून देखील पिंजरा बसविला नसल्या कारणाने व वनखाते नागरिकांची कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास तयार नसेल तर सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांनी धामणी येथील सागदरा येथे बिबट्या वारंवार येत आहे त्याच ठिकाणी रात्री झोपण्याचा निर्णय जाहीर केला व रात्र होताच सरपंच सागर जाधव व युवा सेना उपतालुका प्रमुख अक्षय विधाटे, संजय जाधव, योगेश जाधव, जालिंदर जाधव,सोनाजी जाधव,बापू जाधव, पप्पू देशमुख, अजय पडवळ, ओम जाधव आदी कार्यकर्ते सागदर्यात जाऊन उघड्यावर ठाण मधून बसले या अनोख्या आंदोलनाने वनखात्याला जाग आली रात्रीच साडेदहा वाजता वनरक्षक श्री.अनासुने व कर्मचारी तात्काळ सागदर्यात पोहचले त्या ठिकाणी सरपंच श्री. जाधव व तरूण झोपण्याच्या तयारीत असताना श्री.अनासुने यांनी त्याची भेट घेऊन उद्या सकाळी पिंजरा लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर तरुणांनी त्याठिकाणी झोपण्याचा निर्णय रद्द केला.

हेही वाचा: 'आरोग्य अभियानाकडून कोरोना साहित्याचा पुरवठा बंद' 

पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले,म्हणाले ग्रामस्थ वनखात्याला नेहमीच सहकार्य करत असताना वनखाते जर ग्रामस्थांना सहकार्य करत नसेल तर याबाबत लवकरच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वनखात्याबद्दल तक्रार केली जाणार असल्याचे सांगितले.

वनविभागाने बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी आज गुरुवारी सकाळी पिंजरा लावला असून मंचर वन परिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांनी आज धामणी येथे भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली असल्याचे सरपंच सागर जाधव यांनी सांगितले.

धामणी ता. आंबेगाव : वनखाते बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी पिंजरा लावण्यास टाळाटाळ करत असल्याने तरुणांनी बिबट्या येत असलेल्या परिसरात रात्रभर उघड्यावर झोपुन केले अनोखे आंदोलन

loading image
go to top