पुणे - मांजरीत विकास कामांचे भूमिपूजन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

मांजरी (पुणे) : महिलांना आरक्षण देऊन त्यांचा सन्मान करणारा काँग्रेस हा पहिला व एकमेव पक्ष आहे. त्यामुळेच त्यांना विविध क्षेत्रात आपली कामगिरी उंचविता येत असल्याचे दिसत आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस पक्षाच्या महिलांविषयीच्या ध्येय धोरणांचे कौतुक केले.  

मांजरी (पुणे) : महिलांना आरक्षण देऊन त्यांचा सन्मान करणारा काँग्रेस हा पहिला व एकमेव पक्ष आहे. त्यामुळेच त्यांना विविध क्षेत्रात आपली कामगिरी उंचविता येत असल्याचे दिसत आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस पक्षाच्या महिलांविषयीच्या ध्येय धोरणांचे कौतुक केले.  

जिल्हापरिषदेचे अध्यक्ष विश्र्वास देवकाते यांच्या हस्ते शेवाळेवाडी येथील सुमारे एक कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन झाले. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या.
सरपंच अशोक शिंदे, उपसरपंच प्रियंका शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, पंचायत समितीचे उपसभापती अजिंक्य घुले, महिला प्रदेश उपाध्यक्षा भारती शेवाळे, युवकचे सरचिटणीस विक्रम शेवाळे, माजी सभापती अशोक मोरे, जिल्हापरिषद सदस्य दिलीप घुले, पंचायत समिती सदस्य दिनकर हरपळे, युवकचे माजी जिल्हाध्यक्ष व बारामतीचे निरीक्षक राहुल शेवाळे, राजेंद्र खांदवे, लोचन शिवले, अशोक शेवाळे, जीवन शेवाळे, वसंत शेवाळे आदी यावेळी उपस्थित होते. 

शेवाळेवाडीतील मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण, प्लेव्हिंग बाॅक्स बसविणे, शाळेची वर्गखोली बांधने, सीसी टिव्ही कॅमेरे बसविणे, कामठेवस्ती ड्रेनेज लाईन टाकणे, शिवरस्ता बांधने, ग्रामपंचायत नुतणीकरण, भवरावस्ती जलवाहिनी दुरूस्ती, अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण अशी सुमारे एक कोटी रूपयांची कामे सुरू करण्यात आली आहेत. 

जिल्हापरिषदेचे अध्यक्ष देवकाते म्हणाले, "शेवाळवाडी गावाने आर्शवत कामे केली आहेत. त्यामुळे यापुढेही गावातील विकासकामांसाठी अधिकाधीक निधी देण्याचा प्रयत्न केला जाईल.'' विक्रम शेवाळे यांनी प्रास्तविक केले. सदस्य अक्षय शेवाळे यांनी आभार मानले.

Web Title: inauguration of development work in manjari pune