लोणी येथील घुमटाचे २ ऑक्‍टोबरला उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

पुणे - एमआयटीच्या लोणी काळभोर येथील कॅंपसमध्ये उभारण्यात आलेल्या जगातील सर्वांत मोठ्या घुमटाचे  (संत ज्ञानेश्‍वर महाराज प्रार्थना सभागृह) महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्‍टोबरला उद्‌घाटन करण्यात येणार आहे. या वेळी विश्‍वशांती ग्रंथालयाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या सभागृहात संत, धर्मसंस्थापक, शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ यांचे ५४ पुतळे बसविण्यात आले आहेत. 

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. या निमित्ताने विज्ञान, धर्म आणि तत्त्वाज्ञानावर आधारित जागतिक परिषद होणार आहे, असे डॉ. विश्‍वनाथ कराड यांनी सांगितले. ज्येष्ठ शास्रज्ञ डॉ. विजय भटकर, पं. वसंत गाडगीळ या वेळी उपस्थित होते. 

जागतिक परिषदेत नऊ सत्रांत विज्ञान आणि आध्यात्म या विषयांवर चर्चा होणार आहे. त्यासाठी जगभरातून विविध विद्यापीठांचे कुलगुरू, शास्त्रज्ञ, धर्मगुरू आणि शिक्षणतज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. जगात भौतिक प्रगती होत असताना दुसरीकडे हिंसाचार, जाती-धर्मातील तेढ, दहशतवाद या समस्या जगासमोर उभ्या राहिल्या आहेत. त्यावर परिषदेत चर्चा होणार आहे. विश्‍वशांतीचा संदेश देणारे संत ज्ञानेश्‍वर महाराजांचे पसायदान हे खऱ्या अर्थाने विश्‍वगीत म्हणून मान्य केले जावे, असा ठराव करण्यात येणार आहे. पाच ऑक्‍टोबर रोजी या परिषदेचा समारोप होईल, असे डॉ. कराड म्हणाले. 

Web Title: Inauguration of loni kalbhor dome on October 2 MIT