सन्मित्र सहकारी बँकेच्या स्थलांतरित सासवड शाखेचे उद्घाटन

manjari
manjari

मांजरी - एके काळी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जात असलेल्या सहकारा समोर टिकून राहण्याचे मोठे आव्हान आहे. त्याचाच एक भाग असलेल्या सहकारी बँकांना सध्या मोठ्या दिव्यातून जावे लागत आहे. असे असले तरी जनसामान्यांना पुढील काळातही सहकाराशिवाय पर्याय नाही, असे मत जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केले.

हडपसर येथील सन्मित्र सहकारी बँकेच्या सासवड शाखेचे याच ठिकाणच्या स्वमालकीच्या जागेत स्थलांतर करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन जलसंपदा राज्यमंत्री शिवतारे यांच्या हस्ते तर, चोवीस तास कॅश रिसायकलर यंत्राचे उद्घाटन माजी राज्यमंत्री दादा जाधवराव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. चेअरमन सुनील गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.

बँकेचे मार्गदर्शक माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार अशोक टेकवडे, जगन्नाथ शेवाळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते विजय कोलते, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, विना सोनवणे, डॉ. दिगंबर दुर्गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास आदमाने आदी यावेळी उपस्थित होते. 

बँकेने तीनशे कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा गाठला आहे. नफ्यामध्ये आठ, कर्ज वितरणामध्ये पंचवीस तर ठेवीमध्ये अकरा टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती यावेळी चेअरमन गायकवाड यांनी दिली. संचालक गणेश फुलारे यांनी सूत्रसंचालन केले तर व्हाईस चेअरमन भरतलाल धर्मावत यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com