तोरणा गडावरील विद्युतीकरणाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन

विद्युतीकरणासाठी अत्यंत आव्हानात्मक व खडतर कामाला सुरवात करण्यात आली.
तोरणा गडावरील विद्युतीकरणाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन

वेल्हे : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले तोरणा गडावर पहिल्यांदाच महावितरणकडून करण्यात आलेल्या विद्युतीकरणाचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंगळवार (ता.३०) रोजी करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे,महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे मुख्य अभियंता सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार ,

जिल्हा विद्युत नियंत्रण समितीचे सदस्य प्रवीण शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर ,कात्रज दूध संघाचे संचालक भगवान पासलकर, वेल्हे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष रेणुसे, जिल्हा सरचिटणीस प्रदीप मरळ, माजी तालुकाध्यक्ष शंकरराव भुरूक, वेल्हेचे माजी उपसरपंच सुनील राजीवडे,चेतन मांगडे,मंगेश कोडीतकर आदी उपस्थित होते.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभेमधील भाषणात

वेल्हे, व मुळशी तालुक्यातील छोट्या वाड्या वस्त्यासाठी विद्युतीकरणासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निधीमधून ६ कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल असे यावेळी जाहीर केले.वेल्हे तालुक्यामध्ये समुद्रसपाटीपासून तब्बल १४०३ मीटर उंचीवर असलेला तोरणा गड सह्याद्री पर्वतरांगेमधील महत्वाचा गड आहे. अतिदुर्गम व प्रचंड विस्तार असलेल्या तोरणा गडाचे विद्युतीकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीकडून २७ लाख ८८ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता महावितरणकडून तोरणा गडाच्या विद्युतीकरणासाठी अत्यंत आव्हानात्मक व खडतर कामाला सुरवात करण्यात आली.

यामध्ये उच्चदाबाच्या ११ केव्ही वाहिनीसाठी २७ वीजखांब तसेच लघुदाब वाहिनीसाठी २० खांब उभारण्यात आले. यासोबतच १८०० मीटर लांबीची भूमिगत वीजवाहिनी दऱ्याखोऱ्यातून टाकण्यात आली आहे. तसेच १०० केव्हीए क्षमतेचे रोहित्र उभारून विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. घाटमार्गाने, डोंगरदऱ्यातून ही वीजयंत्रणा उभारण्यासाठी कर्मचाऱ्यांना खांद्यावर वीजखांब व इतर साहित्याची वाहतूक करावी लागली. या विद्युतीकरणामुळे तोरणा गडावर येणाऱ्या पर्यटक व शिवभक्तांची सोय झाली असून पर्यटनाला आणखी चालना मिळणार आहे.

तोरणा गडाच्या विद्युतीकरणासाठी अतिदुर्गम परिसर व दऱ्याडोंगरात वीजयंत्रणा उभारण्यासाठी मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता माणिक राठोड, उपकार्यकारी अभियंता नवनाथ घाटुळे आदींसह अभियंता व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com