Velhe News : ग्राम न्यायालयाच्या माध्यमातून वेल्ह्यातील जनतेला जलद न्याय मिळेल; न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे

वेल्ह्यात ग्राम न्यायालयाचे उद्घाटन संपन्न
Inauguration of Village Court completed Velhe People will get justice  Justice Revathi Mohite Dere
Inauguration of Village Court completed Velhe People will get justice Justice Revathi Mohite Dere sakal

वेल्हे : सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठीची जबाबदारी केवळ न्यायाधीशांची नसून ती वकील वर्गांची सुद्धा आहे. न्यायदान क्षेत्रामध्ये वकील हा महत्त्वाचा घटक आहे. सर्वांनी मिळून ग्राम न्यायालयाच्या कायद्याचा लाभ सामान्य जनते पर्यंत पोहोचवावा असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते- डेरे यांनी केले.

वेल्हे येथे ग्राम न्यायालयाच्या उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर कोंढावळे फाटा (ता. वेल्हे )येथील लक्ष्मी गंगा मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमा वेळी न्यायमूर्ती मोहिते डेरे बोलत होत्या पुढे बोलताना त्या म्हणाल्या,

'ग्राम न्यायालय कायदा २००८ प्रमाणे प्रत्येक तालुका स्तरावर ग्राम न्यायालय स्थापन करण्याची तरतूद आहे ग्राम न्यायालयाच्या कार्यक्षेत्रा मधील खेडेगावांमध्ये मोबाईल कोर्ट व फिरते न्यायालयाच्या माध्यमातून गावांमधील किरकोळ स्वरूपाच्या दिवाणी व फौजदारी खटले जलद प्रक्रियेने निकाली काढण्याची तरतूद कायद्यात आहे अशा वेळी सर्वांसाठी न्याय देण्याचे काम करणे गरजेचे आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे म्हणाले ,'ग्राम न्यायालयानंतर कायमस्वरूपी चे न्यायालय येथे होणे गरजेचे असून जेणेकरून न्यायव्यवस्था सुलभ पद्धतीने होईल.' पुणे जिल्हा सत्र व मुख्य न्यायाधीश श्याम चांडक म्हणाले, 'या ठिकाणी ग्राम न्यायालय स्थापन झाले असले तरी खटले दाखल करण्याची संख्या कमी होण्याचा संकल्प सर्वांनी करणे गरजेचे आहे.'

वेल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्राम गृहामध्ये तात्पुरत्या स्वरूपात ग्राम न्यायालय सुरू करण्यात आले आहे. महिन्याच्या प्रत्येक पहिल्या तिसऱ्या व पाचव्या शनिवारी ग्राम न्यायालय सुरू राहणार आहे.

ग्राम न्यायालयाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पालक न्यायाधीश रेवती मोहिते डेरे यांच्या हस्ते व मुंबई उच्च न्यायालय न्यायाधीश संदीप मारणे , खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्याम चांडक यांच्या अध्यक्षतेखाली रविवार (ता.२७) रोजी पार पडले.

यावेळी वेल्हे ग्राम न्यायालयाचे न्यायाधीश चिंतामण शेळके , अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर, न्यायाधीश बी.पी. क्षीरसागर, न्यायाधीश एच. जे. शेंडे, वेल्ह्याचे तहसीलदार दिनेश पारगे, महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे सदस्य ॲड. राजेंद्र उमाप, गटविकास अधिकारी पंकज शेळके, वेल्हे वकील संघटनेचे अध्यक्ष विजय झांजे ,राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष शंकरराव भुरुक ,

सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे, ॲड.विजया भुरुक ,ॲड.नम्रता भिलारे, वेल्हे पंचायत समितीचे माजी सभापती दिनकर सरपाले,माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, वेल्ह्याचे सरपंच मेघराज सोनवणे ,माजी सरपंच संदीप नगीने, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष रेणुसे, पुणे जिल्हा बँकेच्या संचालिका निर्मला जागडे, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा कीर्ती देशमुख,

राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष तानाजी मांगडे, वेल्ह्याचे माजी सरपंच संतोष मोरे, वेल्हे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष रमेश शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदीप मरळ, मोहन काटकर ,प्रताप शिळीमकर ,किरण राऊत, गोरक्ष भुरूक ,प्रमोद लोहकरे सुनील राजीवडे, शिवाजी चोरघे, रोहिदास शेंडकर, दींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com