वसुंधरा अभियान निर्मित पाण्याच्या टाकीचे उद्घाटन

 बाबा तारे
शुक्रवार, 11 मे 2018

औंध (पुणे) : बाणेर येथील तुकाई टेकडीवर वृक्ष लागवड व पर्यावरण संवर्धनासाठी वसुंधरा अभियान संस्थेने उंच भागात बावीस टाक्या बांधल्या आहेत, त्या टाक्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी टेकडीच्या पायथ्याशी नुकतीच पन्नास हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधली असून त्याचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी वसुंधरा अभियानचे सर्व सदस्य  उपस्थित होते. यापुर्वी संस्थेच्या वतीने टेकडीवर पाण्याच्या बावीस टाक्या बांधल्या असून त्या मार्फत झाडांना पाणीपुरवठा केला जातो.तेविसावी टाकी बांधून यातील पाणी वरती असलेल्या बावीस टाक्यात सोडले जाणार आहे . पाण्याचा वापर वृक्ष लागवड व संवर्धनासाठी केला जाणार असून यामुळे पर्यावरण रक्षणासह टेकडीवर हिरवळ फुलवण्यास मदत होणार आहे.

तसेच टेकडीवरील सर्व  झाडांना नवसंजीवनी देण्यासाठी उपयोग होणार असून, उत्तम प्रकारची जैवविविधता तयार होणार आहे. तुकाई टेकडीवर बांधण्यात आलेल्या सर्व टाक्यांना नद्यांची  नावे देण्यात आलेली आहेत. पन्नास हजार लिटर क्षमतेची ही टाकी येथील सर्वात मोठी असून हिला गोदावरी असे नाव देण्यात आले आहे.

Web Title: inauguration of vasundhara abhiyan water tank