पालिकेला मिळकतकरातून 178 कोटी रुपयांचे उत्पन्न 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

पिंपरी : महापालिका करसंकलन विभागाला मिळकतकरातून तीन महिन्यांमध्ये 177 कोटी 92 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. सर्वाधिक 102 कोटी 26 लाख रुपयांचा भरणा ऑनलाइन झाला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी शनिवारी दिली. 
महापालिकेकडे एप्रिल ते जून दरम्यान, 92 हजार 232 नागरिकांनी 102 कोटी 26 लाख ऑनलाइन जमा केले.

58 हजार 386 नागरिकांनी करसंकलन कार्यालयांमध्ये 30 कोटी 44 लाखांचा कर रोख स्वरूपात जमा केला. 18 हजार 428 नागरिकांनी धनादेशाद्वारे 41 कोटी 93 लाख तर, डिमांड ड्राफ्टद्वारे 233 नागरिकांनी 2 कोटी 63 लाख जमा केले. 92 जणांची 64 लाख 99 हजार रुपयांची समायोजित रक्कम जमा झाली. 

Web Title: The income of the corporation is 178 crores