पोलिस भरतीसाठी आलेल्यांची गैरसोय

संदिप जगदाळे
शुक्रवार, 23 मार्च 2018

हडपसर (पुणे) : राज्य राखीव पोलीस भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो तरुण रामटेकडी येथील राज्य राखीव दल येथे आले आहेत. मैदानावर भरती प्रक्रिया रोज पहाटे चार वाजल्यापासून सुरू आहे. मात्र भरतीसाठी आलेल्या तरूणांना निवासाची सोय नाही. त्यामुळे तरूणांना मैदानाबाहेरील पदपथ, रिकाम्या जागेत रात्रीच्या वेळेस झोपावे लागत आहे. पथ दिव्याखाली हे तरूण अभ्यास करतात. तसेच शौचालयाची सुविधा नसल्याने रामटेकडी डोंगरावर उघड्यावर शौचास जाण्याशिवाय या तरूणांना पर्याय नाही. या ठिकाणी रोज किमान एक हजार उमेदवार उघड्यावर शौचालयास बसत आहेत.

हडपसर (पुणे) : राज्य राखीव पोलीस भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो तरुण रामटेकडी येथील राज्य राखीव दल येथे आले आहेत. मैदानावर भरती प्रक्रिया रोज पहाटे चार वाजल्यापासून सुरू आहे. मात्र भरतीसाठी आलेल्या तरूणांना निवासाची सोय नाही. त्यामुळे तरूणांना मैदानाबाहेरील पदपथ, रिकाम्या जागेत रात्रीच्या वेळेस झोपावे लागत आहे. पथ दिव्याखाली हे तरूण अभ्यास करतात. तसेच शौचालयाची सुविधा नसल्याने रामटेकडी डोंगरावर उघड्यावर शौचास जाण्याशिवाय या तरूणांना पर्याय नाही. या ठिकाणी रोज किमान एक हजार उमेदवार उघड्यावर शौचालयास बसत आहेत. त्यामुळे डोंगर परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून दुर्गंधी पसरली असल्याची येथील रहिवाशांची तक्रार आहे.

रामटेकडी येथील राज्य राखीव दल गट क्र. एक व दोन येथे दिनांक १२ मार्च पासून पोलीस भरती प्रक्रिया चालू आहे. यामधील मैदानावरील चाचणी करिता प्रत्येक गटात किमान एक हजार उमेदवार संपूर्ण महाराष्ट्रातून रात्रीच्या वेळेस या ठिकाणी येत आहेत. घरातून बांधून आणलेले भाजी-भाकरी व स्थानिक नागरिकांनी खाद्य पदार्थाची दुकाने थाटल्याने खाण्याचा व पिण्याच्या पिण्याचा प्रश्न नाही. महाराष्ट शासनाने याबाबत कसली ही सुविधा केली नसल्याने हजारो उमेदवाराची गैरसोय होताना दिसत आहे. 

धुळे येथील सागर बागुल या विद्यार्थ्याने सांगितले, भरतीसाठी आलेल्या तरूणांची निवाऱ्याची सोय नाही. मी अनेक ठिकाणी भरतीसाठी गेलो आहे. रात्र अशीच रस्त्यावर झोपून काढवी लागली आहे. 

सोलापूर येथील दिनेश खरात म्हणाला, भरती साठी रात्रीच वेळेच्या अगोदर आलो आहे. अनोळखी परिसर आहे, कोठे राहण्याची सुविधा नसल्याने रस्त्याच्या कडेच्या पादचारी मार्गावर झोपी गेलो व सकाळी शौचलायसाठी डोंगरावर जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. परिस्थीती नाजूक असल्याने लॅाजवर देखील राहू शकत नाही.

Web Title: inconvenience in process of recruitment of police