esakal | तळेगाव ढमढेरे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात गैरसोय
sakal

बोलून बातमी शोधा

तळेगाव ढमढेरे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात गैरसोय

तळेगाव ढमढेरे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात गैरसोय

sakal_logo
By
नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील प्रथम श्रेणी एकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुपालक शेतकऱ्यांना सुविधाभावी गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचा आरोप अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरूर तालुका अध्यक्ष देवेन्द्र जगताप व कार्यकर्त्यांनी केला आहे.

मंगळवारी (ता. १४) अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरूर तालुक्यातर्फे केलेल्या प्रत्यक्ष पाहणी सर्व्हेक्षणात पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशू वैद्यकीय अधिकारी मुख्यालयाच्या ठिकाणी निवासी राहात नाहीत, पशू वैद्यकीय दवाखाण्यात जनावरांच्या उपचारासाठीचे दरपत्रक नाही, औषध साठा फलक नाही, जनावरांच्या उपचारासाठी शुल्क आकारले बाबतची पावती दिली जात नाही. शासकीय औषधे खाजगी डॉक्टरकडे देउन जनावरांच्या उपचारासाठी खाजगी डॉक्टरची शिफारस केली जाते असे पाहणीत आढळले आहे. या संदर्भात जिल्हा पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांना श्री जगताप यांनी येथील गैरसोयी विषयी कळविले असता समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे श्री जगताप यांनी सांगितले.

हेही वाचा: दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होणार PFचे व्याज?

दरम्यान, सध्या तालुक्यातील जनावरांना संसर्गजन्य रोगाची लागण झाली असून पशू वैद्यकीय अधिकारी लसीकरण करण्यास जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. शेतकऱ्यांची लाखो किमतीची जनावरे या रोगांना बळी पडत असून आर्थिक नुकसान होत आहे. येथील दवाखान्यातील सुविधाविषयी पाहणी केली असता, सर्व गैरसोय असल्याचे निदर्शनास आले आहे. यावेळी देवेंद्र जगताप, सतीश जगताप, पंडित मासळकर, अशोक मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात तीन महिन्यापासून डॉक्टर नसून पद रिक्त आहे , औषध पुरवठा उपलब्ध नाही, ,उपचाराचे दर पत्रक नाही, औषधसाठा फलक नाही, दवाखान्याचा कारभार शिपाई व परिचर हेच सध्या पाहत आहेत.

हेही वाचा: वीजबील थकबाकीची वसुली न झाल्यास राज्य अंधारात जाईल - नितिन राऊत

वरिष्ठ कार्यालयाचे पत्ते तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव, पत्ते, मोबाईल नंबर आदींचे फलक दर्शनी ठिकाणी नाहीत, वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी निवासस्थानाची सुसज्ज इमारत असून निवासासाठी वैद्यकीय अधिकारीच नाहीत, लंपी स्किन, लाळया खुरकत रोगाची लागण जनावरांना झाली असून लस उपलब्ध नाही.दरम्यान, तालुका पशू वैद्यकीय अधिकारी श्री पडवळ यांना संपर्क केला परंतु त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

loading image
go to top