esakal | येवा वाढल्याने खडकवासला धरणातील विसर्गात वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

dam.jpg

मुळशी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, या धरणात 18.46 टीएमसी इतका साठा झाला आहे.

येवा वाढल्याने खडकवासला धरणातील विसर्गात वाढ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : खडकवासला प्रकल्पातील पानशेत आणि खडकवासला धरणांसोबतच वरसगाव धरणही पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे खडकवासला प्रकल्पातून विसर्गात वाढ करून तो 16 हजार 247 क्यूसेक करण्यात आला आहे.

Video : रामभक्तांसाठी आनंदाची बातमी; रामाची चलनी नोट आहे पुण्यात!

खडकवासला प्रकल्पातील चार धरणांत मिळून सध्या 27.42 टीएमसी (94.08 टक्के) इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 12 तासांत सकाळी आठ वाजेपर्यंत 66 मिलिमीटर पाऊस आला. तसेच, वरसगाव 44, पानशेत 45 आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 16 मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला. 

ज्येष्ठांना हवीत सुविधासंपन्न जीवनशैलीची घरे

खडकवासला धरणातील पाण्याचा येवा वाढल्यामुळे खडकवासला प्रकल्पातून मुठा नदीत सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास 11 हजार 704 क्यूसेकने विसर्ग करण्यात येत होता. तो आता सकाळी अकरा वाजल्यापासून वाढविण्यात आला असून, तो 11 हजार 247 क्यूसेक करण्यात आला आहे.

कोरोनाची परिस्थिती आटोक्‍यात येईल :  डॉ. राजेश देशमुख

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा टीएमसीमध्ये, कंसात टक्केवारी : 
टेमघर 2.85    (76.77) वरसगाव 11.96    (93.27) पानशेत 10.65    (100) खडकवासला 1.97   (100)

मुळशी धरण भरले 
मुळशी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, या धरणात 18.46 टीएमसी इतका साठा झाला आहे.
मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे धरणातील जलाशयाच्या पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे दुपारी बारा वाजता विसर्गात वाढ करून 12 हजार क्यूसेक करण्यात आला आहे. पर्जन्यमानानुसार त्यामध्ये वाढ होईल, अशी माहिती टाटा पाॅवरचे धरण प्रमुख बसवराज मुन्नोळी यांनी दिली आहे.

loading image