Traffic Signal
Traffic Signalesakal

Pune News : पुणे शहरात सिग्नल तोडण्याच्या प्रकारांत वाढ

सेनापती बापट रस्त्यावर पीएमपी ठेकेदाराच्या चालकाने बेफिकिरीने बस चालवून प्रवाशांसह नागरिकांचा जीव धोक्यात घातला.

पुणे - सेनापती बापट रस्त्यावर पीएमपी ठेकेदाराच्या चालकाने बेफिकिरीने बस चालवून प्रवाशांसह नागरिकांचा जीव धोक्यात घातला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पुणेकरांच्या मनात पीएमपी प्रवासाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेविषयी पुणेकरांनी मांडलेल्या भावना...

मद्यप्राशन करून चालक बस चालवितो अन त्याची माहिती वरिष्ठांना नसते, हे अत्यंत धोकादायक आहे. पुण्यातील बसचा प्रवास तुलनेने स्वस्त आहे. याशिवाय तो सुरक्षित मानला जातो. मात्र प्रवाशांच्या विश्वासाला या घटनेमुळे तडा गेला आहे. कर्मचाऱ्यांची मानसिकस्थिती कशी आहे, त्यांची नियमितपणे तपासणी होते का, चालकांची आरोग्य तपासणी होते का?, हे पाहणे आवश्यक आहे. चालकांवरील मानसिक ताण कमी होणे गरजेचे आहे.
- मनोहर जोशी, पुणे

अनेकदा ज्या ठिकाणी पीएमपीचा अधिकृत थांबा आहे, तेथे बस थांबत नाही. प्रवासी मागील बाजूच्या दरवाजातून बसमध्ये चढत असताना चालक बस चालविण्यास सुरुवात करतो तर अनेकदा प्रवासी चढत असतानाच दरवाजे बंद केले जातात. त्यामुळे प्रवासी खाली पडण्याचा मोठा धोका असतो. काही चालक बस चालविताना मोबाईलवर बोलतात. त्यांच्यावर पीएमपी प्रशासनाने कारवाई करावी.
- किशोर सुर्वे, पुणे

एखादी दुर्घटना घडल्यानंतरच आपण चर्चा करतो. कर्मचाऱ्यांमध्येही तात्पुरते भीती निर्माण होते. थोड्या दिवसांनी पुन्हा त्यांचा मनमानी कारभार सुरु होतो. पीएमपीचे चालक व वाहक प्रवाशांसोबत उद्धटपणे वर्तन करतात. अधिकृत थांब्यावर न थांबता, बस पुढे जाऊन थांबविणे. शाळांच्या वेळी विद्यार्थ्यांसाठी थांब्यावर बस थांबवली जात नाही. विशेष म्हणजे सर्रासपणे वाहतुकीचे नियम तोडतात. सिग्नल तोडून बस चालविण्याचा प्रकार तर नेहमीचाच आहे. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
- अविनाश खंडारे, पुणे

पीएमपीच्या बसेस बेदरकारपणे चालवल्या जातात, हे खरे आहे. मी सिंहगड रस्त्यावर राहतो. या रस्त्यावर चालकांना सिग्नलचा कमीतकमी त्रास होतो. सिंहगड रस्त्यावर नागरिक क्वचितच वाहतुकीचे नियम पाळतात. संतोष हॉल चौक हा वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक बनला आहे. राजाराम पुलापासून वडगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक पोलिस शोधूनही सापडत नाही.
- सुनील लिमये, पुणे

नगर रस्त्यावरील महापालिकेच्या पाण्याच्या टाकीजवळ सिग्नल आहे, मात्र कोणतेही वाहन या सिग्नलवर थांबत नाही. सिग्नलवर वाहन थांबणार नसेल तर त्या सिग्नलचा उपयोग काय? शिवाय यामुळे अपघाताचा धोका आहे. सुरक्षित रस्ते प्रवासासाठी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे.
- योगेश बापट, पुणे

ॲक्सीलेटर वाढवून आवाज
पीएमपीचा प्रवास फक्त प्रवाशांसाठीच नाही तर रस्त्यावरून वाहन चालविणाऱ्या इतर लोकांसाठीही फारच धोकादायक झाला आहे. विशेषतः पुण्यदशम बसचे चालक अतिशय वेगाने बस चालवितात. मुद्दाम ॲक्सीलेटर वाढवून आवाज करतात, यामुळे अन्य वाहन चालकांच्या मनात भीती निर्माण होते. हा प्रकार थांबायला हवा, असे मत बापूसाहेब ससाणे यांनी व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com