छोट्या उद्योजकांच्या कर्जहमी योजनेची मर्यादा वाढवा; बारामतीतील उद्योजकांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 May 2020

- छोट्या उद्योजकांच्या कर्जहमी योजनेची मर्यादा वाढवा

बारामती : क्रेडीट गॅरंटी फंड स्कीम फॉर मायक्रो अँड स्मॉल एन्टरप्रायजेस (सीजीटीएमएस) या कर्जहमी योजनेची मर्यादा दोन कोटी रुपयांवरुन पाच कोटी रुपयांपर्यंत करुन अडचणीच्या काळात उद्योगांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी बारामतीतीस इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासमवेत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये जामदार यांनी ही मागणी केली. या वेळी उद्योग सचिव बी वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंबलगम, उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे, एम. सी. सी. आय. ए. चे अध्यक्ष प्रदीप भार्गव, प्रशांत गिरबने, दिपक करंदीकर, बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, श्रायबर डायनामिक्सचे प्रकल्प प्रमुख जितेंद्र जाधव, मनोज इंगळे, महिला उद्योजिका उज्वला गोसावी आदी या ऑनलाईन बैठकीत सहभागी झाले होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उद्योगांना सवलतीच्या दरात सुलभ कर्ज उपलब्ध करावे, उद्योगांनी वसूल केलेली जीएसटी रक्कम काही महिने बिनव्याजी वापरण्यासाठी द्यावी, परकीय गुंतवणूक प्राधान्याने महाराष्ट्रात होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करावे अशी मागणी यावेळी केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाऊनमुळे उद्योगांची अवस्था दयनीय झालेली असून, या काळात छोट्या उद्योजकांना शासन स्तरावर मदतीचा हात देणे गरजेचे आहे, त्यासाठी मर्यादा दोन कोटींवरुन पाच कोटी करणे आवश्यक असल्याचे मत जामदार यांनी व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase the limit of small entrepreneur loan scheme demanded by Businessman