उरुळी कांचन परिसरात कोरोनाची पुन्हा उसळी...

corona1
corona1

लोणी काळभोर (पुणे) : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत मागिल चोविस तासात कोरोनाचे आठ नवीण रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे उरुळी कांचन हद्दीतील कोरोनाबाधितांची संख्या ११७ वर पोचली आहे. त्यापैकी ९४ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून, २३ रुग्ण पूर्व हवेलीमधील विविध रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता कदम यांनी दिली आहे. 

उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत मागिल पंधरा दिवसापासून कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग रुग्ण वाढीपुढे हतबल झाल्याचे चित्र निर्माण झाले असतानाच मागिल चार दिवसांपासून रुग्ण वाढीचे प्रमाण अचानक कमी झाले होते. मात्र, मागिल चोविस तासात तब्बल आठ रुग्ण आढळून आल्याने उरुळी कांचन परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

दरम्यान, मागिल चोविस तासात पूर्व हवेलीत दोन कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे उघड झाले आहे. थेऊर येथील ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू गुरुवारी (ता. ३०) दुपारी, तर आळंदी म्हातोबाची येथील एका रुग्णाचा मृत्यू शुक्रवारी (ता. ३१) पहाटे झाला आहे. त्ामुळे मागिल तीन दिवसात मृत्यूमुखी पडलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाचवर पोचली आहे. त्यातील चार रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध न झाल्याने उपचाराअभावी जीव गमवावा लागला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com