पुणे जिल्ह्यातील वकिलांचे धाबे दणाणले , या न्यायालयातील कर्मचाऱ्याला कोरोना

corona
corona

घोडेगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आज चार रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी दोन मंचर येथील, एक थोरांदळे येथील व एक घोडेगाव येथील असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली. तसेच, मंचरला दोन पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झा आहे. एकूण ८ रुग्ण झाल्याने  मंचरकरांची धाकधूक वाढली आहे.

मंचर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सहा होती. त्यात आज दोनने वाढ झाल्याने ही संख्या आठ झाली आहे. मंचर शहर कोरोनामुक्त ठेवण्यासाठी सरपंच दत्ता गांजाळे व व ग्रामस्थ यांनी मिळून आटोकाट प्रयत्न केले. परंतु, त्यांच्या प्रयत्नांना अपेक्षित यश आले नाही. नागरिकांच्या नियम न पाळण्याच्या धोरणामुळे ही परिस्थिती ओढवली असल्याची चर्चा सुरू आहे. मंचरमध्ये आढळले दोन रुग्णांपैकी एक ५५ वर्षाच्या पुरुषाचे निधन झाले. तर, दुसरा रुग्ण 2८ वर्षाचा युवक आहे. 

थोरांदळे येथे आढळलेल्या  २३ वर्षीय रुग्ण हा मंचर येथील याच कुटुंबातील नातेवाईक आहे. घोडेगाव येथील सापडलेला रुग्ण हा ५१ वर्षीय न्यायालयातील कर्मचारी आहे. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने वकिलांचे धाबे दणाणले आहे. हा रुग्ण तहसील कार्यालयातील शासकीय निवासस्थानात राहत असल्याने अनेक जणांच्या संपर्क झाला असल्याची चर्चा आहे. याशिवाय सायंकाळी तहसील कचेरीत व्हॉलीबॉल  खेळण्यासाठी तो येत होता. त्यामुळे त्याचा अनेक लोकांशी संपर्क आला आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  
  
याबाबत गटविकास  अधिकारी जालिंदर पठारे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी सांगितले की, मंचर येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे मंचर हे प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. आंबेगाव तालुक्यात एकूण रुग्ण संख्या एकूण ६९  झाली असून, आतापर्यंत 48 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. त्यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या एकूण अठरा रुग्णांपैकी पुणे येथे तीन व भीमाशंकर हॉस्पिटल येथे पंधरा जण उपचार घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com