इंदापूर तालुक्यात वाढली कोरोनाची साखळी, एकाच दिवसात सापडले... 

राजकुमार थोरात
Tuesday, 7 July 2020

बॅंकेच्या अधिकाऱ्याला दोन दिवसांपूर्वी कोरानाची लागण झाली होती. अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या पाच नागरिकांच्या घशातील नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील उद्धट येथील  कोरोना रुग्णाच्या संपर्कामध्ये आलेल्या रुग्णाच्या पत्नी व मुलीला कोरोनाची लागण झाली. तसेच, इंदापूर शहरातील ३५ वर्षीय शिक्षकालाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे एकाच दिवसात इंदापूरमध्ये कोरोनाचे नव्याने ३ रुग्ण वाढले आहेत.

रांजणगाव गणपती येथील तिघांची कोरोनावर मात

उद्धट गावातील बॅंकेच्या अधिकाऱ्याला दोन दिवसांपूर्वी कोरानाची लागण झाली होती. अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या पाच नागरिकांच्या घशातील नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील दोन अहवाल आले असून, अधिकाऱ्याची पत्नी व मुलीलाही कोरोनाची लागण झाली आहे. इंदापूर शहरातील ३५ वर्षीय शिक्षकालाही कोरोनाची लागण झाली असून, तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये दोन व शहरामध्ये एक नव्याने रुग्ण वाढला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ यांनी सांगितले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

बोरी येथील कोरोनाग्रस्त फळविक्रेत्या युवकाच्या संपर्कातील ९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. फळविक्रेत्याच्या आईचा अहवाल प्रतिक्षेमध्ये आहे, असे लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जीवन सरतापे यांनी सांगितले.  तसेच, कळसमधील दोन संशयित व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तालुक्यातील २५ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase in the number of corona patients in Indapur taluka