
पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत आजही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे शिरूरच्या गटविकास अधिकाऱ्यांचाच कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आलेले आहे.
आंबेगावात दिवसात 28 पॉझिटिव्ह
मंचर : आंबेगाव तालुक्यात सोमवारी 28 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 562 झाली आहे. मृत्यू झालेल्यांची संख्या 13 असून उपचार घेऊन घरी सोडण्यात आलेल्यांची संख्या 394 आहे. 155 जणांवर उपचार सुरू आहेत. मंचर शहरात सर्वाधिक 13 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. अवसरी खुर्द येथे चार, चांडोली बुद्रुक तीन, कानसे 2, अवसरी बुद्रुक, गावडेवाडी, पारगाव तर्फे खेड, अमोंडी, वडगाव काशिंबेग, घोडेगाव येथे प्रत्येकी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे.
जुन्नर तालुक्यामध्ये 24 नवीन रुग्ण
जुन्नर : जुन्नरला ग्रामीण भागात 539 व शहरी भागात 67 असे एकूण 606 रुग्ण आढळून आले आहेत. अमरापूर, मंगरूळ व ओतूर येथे प्रत्येकी तीन, हिवरे तर्फे नारायणगाव, सावरगाव, मांजरवाडी, पाचघर व जुन्नर शहर येथे प्रत्येकी दोन तर बारव, आळे, पिंपरी पेंढार येथे प्रत्येकी एक असे एकूण 24 नवीन रुग्ण सोमवारी आढळून आले. 474 बरे झाले असून 105 जण विविध रुग्णालयात उपचार घेत आहे तर 27 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुळशीत 11 नवीन रुग्णांची भर
पिरंगुट : मुळशी तालुक्यात आज नवीन 11 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या आता 907 झाली आहे. तालुक्यात आज सूस येथे 2, पिरंगुट 1, माण 1, बावधन 1, भुकूम 2, उरावडे 1, नेरे 1, खांबोली 1 तर दारवली येथे 1 रुग्ण सापडला आहे. कोरोनामुक्त झालेल्या 19 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे. सध्या रुग्णालयात 165 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांपैकी 1 रुग्ण अत्यवस्थ अवस्थेत असून अतिदक्षता विभागात 6 रुग्ण उपचार घेत आहेत.
खेडला 24 तासांत 54 जणांना संसर्ग
राजगुरूनगर : खेड तालुक्यात गेल्या चोवीस तासांत 54 कोरोनाबधित आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 2130 वर पोहोचली आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. बी. गाढवे यांनी दिली. चाकण येथील 45 आणि 54 वर्ष वयाच्या दोन पुरुषांचा कोरोनामुळे अनुक्रमे शनिवारी आणि रविवारी मृत्यू झाल्याची आज नोंद झाली. गेल्या चोवीस तासात चाकणला 13, आळंदीला 11 आणि राजगुरूनगरला 10 रुग्णांची भर पडली. तालुक्याच्या ग्रामीण भागात 20 रुग्ण सापडले.
दौंडमध्ये पॅथोलॅाजी लॅब चालकास बाधा
दौंड : दौंड शहरात एका खासगी पॅथोलॅाजी प्रयोगशाळेच्या चालकास कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. खासगी पॅथोलॅाजी प्रयोगशाळांकडून शासकीय यंत्रणांना कोरोना विषाणू चाचणी निदान अहवाल कळविला जात नसल्याने कोरोनाची साखळी न तुटता तिचा गुणाकार होत आहे. शहरातील हिंद थिएटर परिसरात एका २५ वर्षीय खासगी पॅथोलॅाजी प्रयोगशाळेच्या चालकास १५ ऑगस्ट रोजी कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. या खासगी चालकाने स्वतःची कोरोना विषाणू निदान चाचणीसाठी घशातील स्त्राव तपासणीसाठी (स्वॅब टेस्ट) शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये दिले होते.
मोरगाव येथे डॉक्टरास बाधा
मोरगाव : मोरगाव येथे डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे मोरगाव येथील सर्व दुकाने उद्यापासून (ता. 18) ते शनिवारपर्यंत (ता. 22) बंद ठेवण्यात येणार आहे. मोरगाव ग्रामपंचायतीच्या विविध उपाय योजनांमुळे येथे एकही रुग्ण पॉझिटिव्ह सापडला नव्हता. मात्र, आज मोरगाव येथील एका खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मोरगांव ग्रामपंचायत, महसूल व आरोग्य विभाग यांच्याकडून उद्यापासून सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये मेडिकल व दवाखाने वगळता गावातील सर्वच दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन सरपंच नीलेश केदारी यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.