पिंपरी शहरातील प्रदूषण पातळीत वाढ

दीपेश सुराणा
मंगळवार, 31 जुलै 2018

पिंपरी - वाढते शहरीकरण, औद्योगिक क्षेत्र आणि वाहनांच्या संख्येत होत असलेली वाढ यामुळे शहरातील हवा प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर येथे केलेल्या हवेच्या गुणवत्ता तपासणीत नायट्रोजन डायऑक्‍साइडचे प्रमाण दुपटीने, तर मोशी कचरा डेपोजवळील परिसरात सूक्ष्म धुलीकणांचे प्रमाण ५० टक्‍क्‍यांपर्यंत वाढल्याचे निदर्शनास आले. महापालिकेच्या २०१७-१८च्या पर्यावरण अहवालात हा निष्कर्ष आहे. 

प्रदूषणाचे प्रमाण तपासण्यासाठी महापालिका भवन, ‘एमसीसीआयए’ आणि मोशी कचरा डेपो येथे हवेची गुणवत्ता तपासण्यात आली. महापालिका मुख्य कार्यालयात सल्फर डायऑक्‍साइडचे प्रमाण ५० मायक्रोग्रॅम/घनमीटर या निश्‍चित मानांकानुसार १३ ते ३७.८ आढळले आहे. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत ही तपासणी केली. एमसीसीआयए-भोसरी येथे ऑक्‍टोबर २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत नायट्रोजन ऑक्‍साइडचे प्रमाण ४० मायक्रोग्रॅम/घनमीटर या निश्‍चित मानांकाच्या तुलनेत ४९.८ ते १०१.८ पर्यंत तर ‘एमसीसीआयए’ येथे सूक्ष्म धुलीकणांचे प्रमाण १०० मायक्रोग्रॅम/घनमीटर या मानांकापेक्षा ३० ते ५० टक्के वाढल्याचे निदर्शनास आले. मोशी कचरा डेपोच्या १०० मीटर अंतर उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे सूक्ष्म धुलीकणांचे प्रमाण ४८ ते ५४ टक्‍क्‍यांपर्यंत वाढल्याचे आढळले. मे व ऑगस्ट २०१७ आणि जानेवारी अशा तीन महिन्यांत ही तपासणी केली. मंत्राज ग्रीन रिसोर्सेस लिमिटेड संस्थेने ही तपासणी केली. 

मोशी कचरा डेपोच्या परिसराजवळ क्रशर खाणींमुळे हवेतील सूक्ष्म धुलीकणांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरातील हवा प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि प्रामुख्याने सीएनजी, बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांचा वापर वाढवावा. 
- संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता-पर्यावरण, महापालिका 

Web Title: Increase in pollution level in Pimpri city