भाषेच्या समृद्धीसाठी शब्दसंग्रह वाढवा - प्रा. डॉ. विठ्ठल वाघ

चिंचवड स्टेशन - पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीतर्फे अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त लोककवी प्रा. डॉ. विठ्ठल वाघ यांचा सत्कार करताना अण्णासाहेब जाधव, डॉ. श्रीपाल सबनीस, दत्तात्रेय भालेराव, सुदाम भोरे.
चिंचवड स्टेशन - पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीतर्फे अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त लोककवी प्रा. डॉ. विठ्ठल वाघ यांचा सत्कार करताना अण्णासाहेब जाधव, डॉ. श्रीपाल सबनीस, दत्तात्रेय भालेराव, सुदाम भोरे.

पिंपरी - ‘भाषा समृद्धीसाठी शब्दसंग्रह वाढवला पाहिजे. आज इंग्रजी भाषा सगळीकडे राज्य करत आहे, कारण तिचा शब्दसंग्रह विपुल आहे. भाषा जगण्याचे साधन बनले पाहिजे. त्यासाठी तिला जगवले पाहिजे,’’ असे आवाहन प्रा. डॉ. विठ्ठल वाघ यांनी केले. 

पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीतर्फे आयोजित कार्यक्रमात वाघ यांचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. याच कार्यक्रमात दिवाळी अंक पारितोषिक प्रदान समारंभ झाला. तर पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांना विशेष सन्मानित करण्यात आले. डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. पी. डी. पाटील, सुदाम भोरे, अण्णासाहेब जाधव, पुरुषोत्तम सदाफुले, बाळाराम पाटील, दत्तात्रेय भालेराव उपस्थित होते.वाघ म्हणाले, ‘‘भाषा बदलली की संस्कृती बदलते. संस्कृती जपण्यासाठी भाषा जगवली पाहिजे.म्हणूनच मी २२ हजार शब्दसंग्रह, १४ हजार वाक्‌प्रचार आणि नऊ हजार म्हणी तयार केल्या आहेत.’’ सबनीस म्हणाले, ‘‘गरिबांच्या मुलांसाठी प्रतिकूल परिस्थितीतून शाळा उभी करणे हे शून्यातून विश्‍व निर्माण करण्यासारखे आहे.’’ मानसी चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. जयवंत भोसले यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com