वाढीव वीज बिलांचा पुण्यातील ग्राहकांना फटका

electricity-bill
electricity-bill

रामवाडी - चुकीच्या रिडींगचा फटका काही वीज ग्राहकांना बसत असल्याने महावितरण विभाग  सोमनाथनगर वडगावशेरी येथे  नागरिकांचे  हेलपाटे सुरु आहे.   महावितरण विभागाच्या निष्काळजीपणाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याने नागरिकां कडून संताप व्यक्त केला  जात आहे.  मीटर रिडींग घेऊन बिल आकारलं जावे अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात  तीन महिने अंदाजे वीज  बील  आकारण्यात आले  परंतु सध्या अनलॉक सुरु असुन ही भरमसाठ वीज बीलाचा फटका नागरिकांना  बसत आहे. काही ग्राहकांना रिडींग नुसार बिले आले  तर काहींना अंदाजे बिल लावण्यात आले. मुळात कोरोनामुळे  काहींच्या नोकऱ्या गेल्या तर काहीचा निम्या पगारावर काम करून उदरनिर्वाह सुरु आहे  अशा समस्याने नागरिक त्रस्त असताना या वाढीव वीज बिलाचा भुर्दंड मात्र सामान्य नागरिकांना  बसत आहे. गावी गेल्याने काही चे वीज मीटर बंद असुन ही त्यांना भरमसाट वीज बिल आकारण्यात आल्याचे नागरिकां कडून सांगण्यात आले आहे.  घरातील जेष्ठ नागरिकां पासुन ते  नोकरी व्यवसाय करणाऱ्या  नागरिकांना आपल्या कामातुन  वेळ काढुन वाढीव  वीज बिलां संदर्भात महावितरण विभागा कडे धावाधाव सुरु आहे. वीज मीटर पाहुन रिडींग घेतले जावे अशी मागणी नागरिकां कडून केली जात आहे. 

 दत्ताराम जळगांवकर - (वय 72 ) स्थानिक रहिवासी : मी आर्मी रिटायर आहे.  मला एक महिन्याचे बिल 9860 रु बिल देण्यात आले. लेखी तक्रार दिल्यानंतर मीटर रिडींगमध्ये चुक झाल्याने एवढं बिल आले असे सांगण्यात आले होते.  ते बिल नंतर दुरुस्त करून 420 रु करून देण्यात आले . माझ्या सारख्या अनेक जेष्ठ नागरिकांना फेऱ्या माराव्या लागत असल्याने मानसिक त्रास होत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिलीप मदने : अति.कार्यकारी अभियंता  महावितरण विभाग वडगावशेरी : लॉकडाऊनच्या काळात मीटर रिडींग घेतले नव्हते चार  महिन्याचे बिल हे आधीच्या बिलाचा अंदाज घेऊन देण्यात आले आहे.जर वाढीव बिलाची तक्रार असेल तर महावितरण विभागाशी संपर्क साधावा. चुकीचे बिल जर आकारण्यात आले असेल तरच  दुरुस्त करण्यात येईल .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com