धुरामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

पिंपरी - खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या वल्लभनगर येथील कचरा डेपोला आग लागून बुधवारी (ता. 4) सात दिवस उलटले. त्यातून निघणाऱ्या धुरामुळे श्‍वास गुदमरणे, डोळे चुरचरणे, लाल होणे, व्हायरल फीव्हर, असे विकार नागरिकांना होत आहेत. त्यामुळे परिसरातील दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

पिंपरी - खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या वल्लभनगर येथील कचरा डेपोला आग लागून बुधवारी (ता. 4) सात दिवस उलटले. त्यातून निघणाऱ्या धुरामुळे श्‍वास गुदमरणे, डोळे चुरचरणे, लाल होणे, व्हायरल फीव्हर, असे विकार नागरिकांना होत आहेत. त्यामुळे परिसरातील दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

पुणे-मुंबई व पुणे-नाशिक महामार्गालगत वल्लभनगर येथे 22 एकर जागेवर खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाचा कचरा डेपो आहे. त्याला गुरुवारी (ता. 29) आग लागली होती. त्यावर पाण्याचा मारा केला जात आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. अनेकांना श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याने वैद्यकीय उपचार घ्यावे लागत आहेत. या परिसरात राहायचे की नाही? असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत. 

डॉक्‍टर म्हणतात... 
धुरामुळे श्‍वास गुदमरणे, डोळे चुरचुरणे, खोकला, घसा दुखणे, जंतुसंसर्ग, मळमळणे, अपचन अशा विकारांचा त्रास नागरिकांना होत आहे. 

तज्ज्ञ म्हणतात... 
कचरा व प्लॅस्टिक जाळल्यामुळे निघणाऱ्या धुरात कार्बनडाय ऑक्‍साइड, सल्फरडाय ऑक्‍साइड असे विषारी वायू असतात. 

गेल्या सात दिवसांपासून घरात धूर येत असल्याने त्रास होत आहे. श्‍वास घ्यायला त्रास होत आहे. रात्रभर झोप नसते. आग लवकर विझणे आवश्‍यक आहे. परिसरातील नागरिकांना राहणे मुश्‍कील झाले आहे. 
- लीला म्हेत्रे, गृहिणी, वल्लभनगर 

उन्हाबरोबरच धुरामुळे उकाडा वाढला आहे. मास्क लावून काम करणे अशक्‍य आहे. श्‍वास गुदमरणे, डोळे चुरचुरणे, खोकला, मळमळणे, अपचन असे त्रास होत आहेत. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. 
- डॉ. सुहास जाधव, संत तुकारामनगर 

कचरा व प्लॅस्टिक जाळल्यामुळे निघणाऱ्या धुरात अनेक सूक्ष्म रासायनिक घटक असतात. त्यातील राखेत सल्फाइडचे प्रमाण अधिक असते. त्यातील बारीक कणांचा आरोग्यावर अधिक परिणाम होतो. 
- डॉ. किरण पुजारी, रसायनशास्त्रज्ञ 

Web Title: Increased number of patients due to Fire smoke