Vetal Tekdi : वेताळ टेकडीवर येणाऱ्या टवाळखोरांवर कडक कारवाई करण्याची मगणी

वेताळ टेकडीवर पार्ट्या करणाऱ्या टवाळखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी, मोरांचे अस्तित्व टिकवण्यासाठी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, प्रशासनाच्या गांभीर्याचा अभाव हे मूलभूत कारण, पाण्याच्या बाटल्या , कॅरीबॅग इतर माध्यमातून प्लास्टीक टेकडीवर नेले जाते.
Vetal Tekdi
Vetal TekdiSakal

शिवाजीनगर : वेताळ टेकडीवर पार्ट्या करणाऱ्या टवाळखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी, मोरांचे अस्तित्व टिकवण्यासाठी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, प्रशासनाच्या गांभीर्याचा अभाव हे मूलभूत कारण, पाण्याच्या बाटल्या , कॅरीबॅग इतर माध्यमातून प्लास्टीक टेकडीवर नेले जाते.

अतिक्रमणामुळे टेकड्या नामशेष होत आहेत, त्यामुळे जंगली प्राणी, पशु, पक्षी यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे, निसर्ग वचवण्यासाठी वन विभाग, पोलिस प्रशासन , व्यायाम प्रेमी व इतर सर्व नागरिकांनी एक दिलाने पुढाकार घ्यावा अशा प्रतिक्रिया नगरिकांनी दिल्या आहेत. 'वेताळ टेकडीवर चुली मांडून पार्ट्या' होत असल्याची बातमी 'सकाळ' मध्ये प्रसिध्द करण्यात आली होती, या प्रकाराबाबत नागरिकांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया.

''टेकड्या वाचवा पर्यावरण वाचवा, वेताळ टेकडीवर चुली मांडून भोजन, मद्यपान राजरोसपणे होते, परंतु यावर कारवाई केली जात नाही. हा प्रकार वनखात्याला माहितीच नाही असे वन अधिकारी सांगतात, हा मोठा संशोधनाचा विषय आहे.

भटक्या कुत्र्यांचा विषय गांभीर्याने घेऊन तो मार्गी लावला पाहिजे नाहीतर राष्ट्रीय पक्षी मोर हा काही दिवसांनी फक्त चित्ररूपाने पहावा लागेल. टेकड्या वाचवण्यासाठी प्रशासनाने इच्छाशक्ती दाखवली पाहिजे. पर्वती टेकडीचे रूपांतर झोपडपट्टीमध्ये झाले आहे. अशाच प्रकारे टेकड्या नामशेष होत आहेत. टेकड्या वाचवूया पर्यावरणाचे रक्षण करूया.''

- अनिल बाळासाहेब अगावणे

''पोलिस सुरक्षा असताना काही लोकं बेतालपणे वागतात ही आश्चर्याची गोष्ट आहे. टेकडीवर टोळकी काही कृत्य करत असतील तर कडक कारवाई करावी.''

- राजीव पालकर

''मी रोज टेकडीवर फिरायला जातो, तरुण मुलांकडून आडोशाला बसून हुक्का पिण्याचे प्रकार मी स्वतः डोळ्यांनी बघितले आहेत. यातूनच आग लागण्यासारखे प्रकार घडत असतात.काही नागरिक डोंगरावर मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशव्या ,रॅपर्स , बॉटल्या घेऊन जातात. वन विभागाकडे भरपूर निधी असतो. चुकीची कृत्य करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करून वन कोठडी ( मेंढी फार्म येथे नवीन बांधली आहे ) त्यामध्ये डांबून ठेवण्यात येईल अशा आशयाचे फलक जागोजागी लावावेत.''

- योगेश बहिरट

''निसर्गाचे संवर्धन करणे व त्यात वृद्धी करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. तरीही काहीजण निसर्गात हस्तक्षेप करून त्याचे सौंदर्य बिघडवतात. मद्यपान पार्टी तसेच तरुणाईचा धांगडधिंगा हा उद्वेग आणणारा भाग आहे.

पोलीस खाते, वनखाते यांचे सोयीस्कर दुर्लक्ष असते. तर बऱ्याचदा अर्थपूर्ण कार्यामुळे टेकडीवरील झाडांची कत्तलही केली जाते. नैसर्गिक टेकड्या कमी होत आहेत. तर बऱ्याचदा त्याच्यात बदल करून बांधकामासाठी उपयोगात आणणारी वृत्ती आहे. नियमितपणे गस्त घालत अशा गोष्टींना अटकाव केला पाहिजे. त्याचबरोबर पर्यावरण प्रेमींनी घडणाऱ्या गोष्टी समोर आणायला हव्या.''

- राजन बिचे

''मानवी वस्तीने वेढलेल्या जंगलांना मानवी श्वापदांचा उपद्रव कायम रहाणार आहे. त्यासाठी ही जंगले खाजगी सामाजिक संस्थांच्या ताब्यात द्यावीत व सशुल्क प्रवेश असावा.''

-प्रशांत उमरदंड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com