esakal | Video : लसीकरणासाठी पुणेकरांच्या रांगा; कोरोनाच्या भितीने लस घेण्यासाठी गर्दी
sakal

बोलून बातमी शोधा

good response for corona vaccination above 45 years started in india

भारतात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरवात झाली. पहिल्या टप्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानंतर 1 मार्चपासून दुसऱ्या टप्यात 60 वर्षापासून पुढील ज्येष्ठ नागरिकांना आणि सहव्याधी असलेल्या नागरिकांना लसीकरण करण्यात आले. आता तिसऱ्या टप्प्यात आज पासून 45 पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना लसीकरण सुरु केले आहे.

Video : लसीकरणासाठी पुणेकरांच्या रांगा; कोरोनाच्या भितीने लस घेण्यासाठी गर्दी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : वयाच्या ४५ पेक्षा जास्त वर्षाच्या सर्व नागरिकांसाठी लसीकरणाला आज (गुरुवार, ता. १) सुरवात होत आहे. दरम्यान आज पुणे शहरात 105 केंद्रावर लसीकरण सुरु करण्यात आली असून नागरिकांची गर्दी दिसत आहे. सकाळी 9 वाजता लसीकरणाला सुरवात झाली असून केंद्राबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे कोरोना लसीकरणालाही 45 पेक्षा जास्त वर्षाच्या नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान सोशल डिस्टसिंग ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर राज्याने पुणे शहरासाठी 1 लाख 40 हजार डोसचा पुरवठा केला आहे.  तर केंद्राने राज्याला कोव्हिशिल्ड लसीचा २७ लाख डोसचा पुरवठा पुढील दोन दिवसांमध्ये केला जाईल. त्याचे तातडीने वितरण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असेही आरोग्य खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले. लस वितरण आणि प्रत्यक्ष लसीकरणाच्या व्यवस्थेत कोणताही बदल केला नाही. मात्र, लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्याने केंद्रांची संख्या त्या प्रमाणात वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारतात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरवात झाली. पहिल्या टप्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानंतर 1 मार्चपासून दुसऱ्या टप्यात 60 वर्षापासून पुढील ज्येष्ठ नागरिकांना आणि सहव्याधी असलेल्या नागरिकांना लसीकरण करण्यात आले. आता तिसऱ्या टप्प्यात आज पासून 45 पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना लसीकरण सुरु केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे महापालिका शहरातील लसीकरण व्यवस्था
लसीकरणासाठी सज्ज असलेली केंद्रे : १०५
पुण्याला मिळालेली कोव्हिशिल्ड लशीचे डोस : एक लाख ४० हजार
सरकारी आणि खासगी रुग्णालयातील व्यवस्था सज्ज

लसीकरणाला जाताना
www.cowin.gov.in यावर लॉगिग करा किंवा Cowin.app यावर नोंदणी करा.
किंवा लसीकरणासाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन जवळच्या लसीकरण केंद्रावर जा.

गजा मारणे मिरवणूक प्रकरण : गुंड समर्थकांचं फोन रेकॉर्ड पोलिस तपासणार

अत्यावश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड, वयाचा पुरावा असलेले ओळखपत्र (जन्माला
दाखला, पॅन कार्ड, पारपत्र)
- ४५ ते ५९ वर्षे वयातील व्याधीग्रस्त नागरिकांनी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाने दिलेले प्रमाणपत्र केंद्रावर बरोबर आणावे

अशी करा नावनोंदणी
- नावनोंदणीसाठी www.cowin.gov.in यावर लॉगिंन करा किंवा Cowin app वापरा
- रजिस्ट्रेशनवर क्लिक करून मोबाईल क्रमांक टाका
- त्यानंतर गेट ‘ओटीपी’वर क्लिक करा
- ‘एसएमएस’च्या माध्यमातून आलेला ‘ओटीपी’ नंबर टाकून ‘व्हिरिफाय’ करा
- ‘ओटीपी’ची पडताळणी झाल्यानंतर तुमच्या स्क्रिनवर ‘रजिस्ट्रेशन ऑफ व्हॅक्सिनेशन’ पान येईल
- यात वय आणि छायाचित्र असलेले ओळखपत्र निवडा
- जन्मवर्ष, लिंग, सहव्याधी असा सर्व तपशील नोंदणी करताना भरावा
- नोंदणी पूर्ण झाल्यानंतर त्याचा सविस्तर माहिती दिसेल

अखेर ठरलं! पुणे विद्यापीठाची परीक्षा ११ एप्रिलपासून; नवे वेळापत्रक लवकर जाहीर होणार

लस घेतल्यानंतर दिसणारी सामान्य लक्षणे
- हलकी डोकेदुखी
- चक्कर येणे
- घाम येणे
- जडपणा
- लाल डाग
- सूज
- हलका ताप
 

बारामतीत हनीट्रॅप! बडतर्फ पोलिसांसह सातारच्या चौघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
 

loading image