ई पॉस मशिनद्वारे धान्य वितरणात इंदापुरचा दुसरा क्रमांक

संदेश शहा
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

इंदापूर (पुणे) : इंदापूर तालुक्याने शासनाच्या आधार सक्षम सार्वजनिक वितरण प्रणाली या महत्वकांक्षी प्रकल्पाअंतर्गत ई पॉस मशिनद्वारे धान्य वितरणात जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावून आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे नागरिकांच्या धान्य मिळण्यासंदर्भातील तक्रारी देखील कमी झाल्या आहेत.

इंदापूर (पुणे) : इंदापूर तालुक्याने शासनाच्या आधार सक्षम सार्वजनिक वितरण प्रणाली या महत्वकांक्षी प्रकल्पाअंतर्गत ई पॉस मशिनद्वारे धान्य वितरणात जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावून आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे नागरिकांच्या धान्य मिळण्यासंदर्भातील तक्रारी देखील कमी झाल्या आहेत.

स्वस्त धान्य दुकानदारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शासकीय पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही पुणे आयुक्त (पुरवठा) कार्यालयाच्या उपायुक्त निलीमा धायगुडे यांनी दिली. इंदापूर प्रशासकीय भवन सभागृहात तालुका स्वस्त धान्य व रॉकेल दुकानदारांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना श्रीमती धायगुडे बोलत होत्या. यावेळी ई पॉस यंत्रणा सुरू झाल्यापासून सर्व महिन्यात 100 टक्के धान्य वितरीत केल्याबद्दल पुणे आयुक्त कार्यालयाच्या वतीने सारीका सोनवणे (गागरगाव), सुवर्णा शिंदे (कळस), मोरे (शेटफळ हवेली), राजेंद्र धायगुडे (लासुर्णे) तसेच लुमेवाडी येथील महिला बचत गटाचा प्रमाणपत्र देवून उपायुक्त धायगुडे, अन्न पुरवठा विभागाचे तांत्रिक तहसिलदार आर. ए. ताडगे, पुरवठाअधिकारी संतोष अनगिरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. उपायुक्त धायगुडे यांचा तहसिलदार सोनाली मेटकरी व संघटनेच्या वतीने माजी नगराध्यक्षा माया विंचू तर स्वस्त धान्य दुकानदारांचे रास्त प्रश्न मांडल्याबद्दल संघटना तालुकाध्यक्ष केशव नगरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

निलीमा धायगुडे पुढे म्हणाल्या, तालुक्यात 61 हजार लाभार्थी असून ई पॉसव्दारे 51 हजार नागरिकांना धान्य वितरण होत आहे तर 10 
हजार नागरिकासंदर्भात काही समस्या आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना
नुसार धान्य वितरण न करणा-या दुकानदारांवर योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष केशव नगरे म्हणाले, शासनाने राष्ट्रीय सुरक्षा अभियान सुरू करण्यापुर्वी दुकानदारांनी सन 2014 
मध्ये गहू व तांदळासाठी पैसे भरले होते. सदर पैसे ट्रेझरीत अडकून पडले असून शासनाने बॅंक नियमाप्रमाणे व्याजानुसार सदर पैसे दुकानदारांना परत करणे गरजेचे आहे. सन 2008 ते 10 पर्यंत गावात शालेय पोषण आहाराअंतर्गत दिलेल्या गहू व तांदूळाचे पैसे शासनाने देणे गरजेचे आहे. शासनाने दुकानदारांचा मेडीक्लेम विमा उतरवावा आदी मागण्या त्यांनी यावेळी केल्या.

यावेळी वामनराव सरडे, गोपीचंद गलांडे, साहेबराव घोगरे, राजेंद्र जाधव, नाना पोळ, सुभाष भोंगळे, एस. पी. पारेकर, शालन सोनवणे, लहू निकम, मारकड उपस्थित होते.

Web Title: Indapur on 2nd rank on for distribution of pulse through e pos machine