इंदापूर बंदला १०० टक्के प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

इंदापूर - इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांचा ३ वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच झालेल्या बदलीच्या निषेधार्थ समस्त इंदापूरकरांच्या वतीने सोमवारी दुपारी एकपर्यंत पाळलेल्या ‘बंद’ला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. ‘बंद’मधून अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. गेल्या अडीच महिन्यांत शहर तब्बल नऊवेळा बंद झाल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. शहरातील नागरिकांनी बंद काळात प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले.

तहसीलदार पाटील यांची बदली रद्द करावी म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे जिल्हा ग्राहक मंच तसेच शहरातील विविध सामाजिक संस्था, पक्ष, स्वयंसेवी संस्थाच्या वतीने ‘बंद’चे आयोजन केले होते. त्यास व्यापाऱ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. 

दरम्यान, तहसीलदारांची बदली रद्द करण्याच्या मागणीचा तालुक्‍यातील ७५ गावांचा ठराव घेऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तुषार शेंडे मुंबई मंत्रालयात गेले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते जनार्दन पांढरमिसे यांनी सुरू केलेल्या सह्यांच्या मोहिमेस मोठा प्रतिसाद मिळाला. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य माउली चवरे यांनी मुख्यमंत्री तसेच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटीची वेळ मागितली असून मंत्री पाटील यांनी बुधवारी वेळ दिली आहे. भाजपचे शहराध्यक्ष माउली वाघमोडे यांनी पालकमंत्री गिरीश बापट तर राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा संघटक किरण गोफणे यांनी दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांना निवेदन पाठवले आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. कृष्णाजी यादव यांनीही तहसीलदार पाटील यांची बदली रद्द करावी, या मागणीस पाठिंबा दिला आहे. 
ॲड. यादव म्हणाले, ‘‘श्रीकांत पाटील हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत.

इंदापूरला रूजू झाल्यापासून त्यांनी सर्वसामान्यांची कामे केली आहेत. तालुक्‍यात जलसंधारणाच्या कामात त्यांनी सक्रिय भाग घेतला. वाळू व गौण खनिज माफियांना चाप लावला. त्यांची राजकीय हेतूने बदली करण्यात आली असून मुख्यमंत्री, महसूल मंत्री तसेच पालकमंत्र्यांनी त्यांची बदली तातडीने रद्द करावी.’’

Web Title: Indapur Close by Tahsildar Transfer