जातीवाचक शिविगाळ केल्याच्या खटल्यात इंदापूरात दोघांना शिक्षा | Court | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Court

जातीवाचक शिविगाळ केल्याच्या खटल्यात इंदापूरात दोघांना शिक्षा

बारामती : जातिवाचक शिविगाळ व दमदाटी केल्याच्या खटल्यात येथील जिल्हा न्यायाधिश एस. टी. भालेराव यांनी दोघांना तीन वर्षे शिक्षा व 14 हजारांचा दंड ठोठावला. बापूराव रघुनाथ तनपुरे व राजेंद्र रघुनाथ तनपुरे (रा. उदमाईवाडी, ता. इंदापूर) या दोघांना ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 2016 मध्ये हा खटला दाखल करण्यात आला होता. (Indapur Crime News)

उदमाईवाडी येथे गुरांच्या गोठ्यातील स्वच्छतागृहाचे पाणी सार्वजनिक पाटात सोडण्यात आले होते. हे पाणी का सोडले याची विचारणा या प्रकरणातील फिर्यादी महिलेने या दोघांकडे केली होती. त्यावरून फिर्यादीसह तिच्या दीराला या दोघांनी सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिविगाळ, दमदाटी केली होती. या प्रकरणी संबंधित महिलेने वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर यांनी या प्रकरणी तपास करत आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

हेही वाचा: जपानमधून व्हिसीद्वारे शपथ : प्रतिज्ञापत्र न्यायालयाने धरले ग्राह्य

या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील डी. एस. शिंगाडे यांनी चार साक्षीदार तपासले. त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दोघांना शिक्षा सुनावली. यात बापूराव यांना तीन वर्षे शिक्षेसह नऊ हजार दंड तर राजेंद्र यांना तीन वर्षे शिक्षेसह पाच हजार रुपये दंड करण्यात आला. या खटल्यात सरकार पक्षाला वालचंदनगरचे सहाय्यक फौजदार डी. एस. जगताप, एन. ए. नलवडे यांनी मदत केली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewsCourt
loading image
go to top