Indapur Crime : वयोवृद्ध आजीला गळ्यातील सोन्यासाठी मारहाण करत लुटले

इंदापूर शहरांमध्ये एका महिन्यात दोनदा दिवसाढवळ्या जेष्ठ नागरिकांना लुटण्याचे प्रकार घडल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये घबराट.
Old Woman
Old WomanSakal

इंदापूर - शहरांमध्ये दिवसाढवळ्या एका वयोवृद्ध आजीला गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांसाठी दुचाकीवर घरी सोडण्याचे अमिष दाखवीत दुचाकीवरून अज्ञात स्थळी नेत जबरदस्त मारहाण करीत लुटले.

दरम्यान एका महिन्यात दोनदा ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याचे प्रकार इंदापूर मध्ये घडल्याने शहरातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये घबराट पसरली असून अशा चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवार (ता. 27) रोजी भर दुपारी बिजवडी ग्रामपंचायत हद्दीतील वनगळी गावच्या रहिवाशी असलेल्या रुक्मिणी पांडुरंग करगळ (वय-80 वर्षे) या सकाळी गावावरून इंदापूर शहरात औषधे खरेदीसाठी आल्या होत्या.

ते करून दुपारी घराकडे परतत असताना शहरातील बाब्रस पेट्रोल पंपाच्या जवळ पाठीमागून लूना गाडीवर हेल्मेट परिधान करून आलेल्या व्यक्तीने पुढे सोडतो म्हणून आजीला गाडीवर बसवले. त्यानंतर त्याने पंपावर पेट्रोलही टाकले. व पुढे बाह्यवळण मार्गाने सरडेटोल नाक्याच्या दिशेने अज्ञातस्थळी नेत बेदम मारहाण करीत गळ्यातील व दोन्ही कानातील दागिने हिसका देऊन ओरबाडून काढले यामध्ये आजीच्या कानाला व गळ्याला गंभीर दुखापत झाली.

तसेच चोरट्याने आजीला मारहाणही केली असल्याचे आजीने संगितले. यामुळे आजीच्या हात, पाय, गळा ,कान यांना गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत इंदापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com